MAH-LLB CET 2025 : आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार नोंदणी

राज्य सीईटी सेल कार्यालयाला उमेदवार आणि पालकांकडून एमएएच एलएलबी अभ्यासक्रमासाठी सीईटी २०२५ च्या फॉर्म भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून, सीईटी सेलने अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

MAH-LLB CET 2025 : आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार नोंदणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (State Common Entrance Test Cell, Maharashtra) एमएएच एलएलबी सीईटी २०२५ साठी (MAH LLB CET 2025) नोंदणीची (Registration) तारीख वाढवली आहे. एमएएच-एलएलबी ५ वर्षांच्या सीईटी २०२५ साठी आता अर्ज करण्याची अंतिम तारीख (Application deadline) १८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. उमेदवार एमएएचसीईटीच्या https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.

राज्य सीईटी सेल कार्यालयाला उमेदवार आणि पालकांकडून एमएएच एलएलबी अभ्यासक्रमासाठी सीईटी २०२५ च्या फॉर्म भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून, सीईटी सेलने अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

एमएएच एलएलबी सीईटी २०२५ चा अर्ज कसा करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम एमएएचसीईटीची अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर होम पेजवर उपलब्ध असलेल्या नोंदणी लिंकवर क्लिक करा. एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना नोंदणी तपशील प्रविष्ट करावे लागतील. त्यानंतर सबमिट वर क्लिक करा आणि अकाऊंट लॉग इन करा. एकदा पूर्ण झाल्यावर, अर्ज फॉर्म भरल्यानंतर अर्ज शुल्क भरा. सबमिट वर क्लिक करा आणि पेज डाउनलोड करा. पुढील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.

दरम्यान, या परीक्षेत कायदेशीर अभियोग्यता आणि कायदेशीर तर्क (Legal Aptitude and Legal Reasoning), चालू घडामोडींसह सामान्य ज्ञान (General Knowledge with Current Affairs),तार्किक आणि विश्लेषणात्मक तर्क (Logical and Analytical Reasoning), इंग्रजी (English) आणि गणितीय अभियोग्यता(Basic Mathematics) अशा पाच विभागांसह एक पेपर असेल. या परीक्षेसाठी एकूण १५० प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न इंग्रजी आणि मराठीमध्ये असतील. यासाठी कोणतेही नकारात्मक गुणांकन नसेल. अधिक माहितीसाठी उमेदवार MAHACET ची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.