आविष्कार स्पर्धेसाठी विद्यापीठ सरसावले; निधीमध्ये केली वाढ 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालय व विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विभाग प्रमुखांनी येत्या पाच सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांसाठी आविष्कार स्पर्धेसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करावे. तसेच या संदर्भातील अहवाल 20 सप्टेंबर पर्यंत विद्यापीठाकडे सादर करावा.

आविष्कार स्पर्धेसाठी विद्यापीठ सरसावले; निधीमध्ये केली वाढ 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ' आविष्कार' या अंतरविद्यापीठ स्तरीय संशोधन स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या(Savitribai Phule Pune University)विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करावी, यासाठी विद्यापीठ प्रशासन सरसवले आहे. विद्यापीठाने आविष्कार स्पर्धेच्या (Invention Competition)निधीत मोठ्या प्रमाणावर वाढ केली असून प्रत्येक महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी आविष्कार स्पर्धेविषयक कार्यशाळेचे आयोजन केले आहे. 

राज्यपाल कार्यालयातर्फे राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांसाठी आविष्कार ही संशोधन स्पर्धा आयोजित केली  जाते. सावित्रीबाई फुले विद्या पुणे विद्यापीठाने गेल्या 17 वर्षात आविष्कार स्पर्धेत उत्तुंग यश प्राप्त केले आहे. त्यानंतर पुढील टप्पा म्हणून विद्यार्थ्यांमधून उद्योजक व संशोधक निर्माण करण्याच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष 2025 च्या आविष्कार स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना विद्यापीठातील सायन्स व इनोवेशन पार्क इंक्युबॅशन सेंटर आणि ASPIRE सारख्या संशोधन प्रोत्साहन योजनांशी जोडण्याचा महोदय कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी व्यक्त केला आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.देविदास वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली आविष्कार संशोधन समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने दिलेल्या शिफारशीनुसार नवीन कार्यपद्धती निश्चित करण्यात आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालय व विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विभाग प्रमुखांनी येत्या पाच सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांसाठी आविष्कार स्पर्धेसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करावे. तसेच या संदर्भातील अहवाल 20 सप्टेंबर पर्यंत विद्यापीठाकडे सादर करावा.अहवाल सादर करणाऱ्या महाविद्यालयांनाच त्यासाठीचा निधी वितरित केला जाणार आहे.तसेच येत्या 13 सप्टेंबर पर्यंत महाविद्यालय व विद्यापीठ विभाग स्तरावर अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करावे. येत्या  20 सप्टेंबरपर्यंत या स्पर्धेतून विभाग स्तराकरिता पात्र विद्यार्थ्यांची निवड करावी.

अविष्कार स्पर्धेसाठी प्रत्येक महाविद्यालयाने व विभाग प्रमुखाने आपल्या संस्थेतील एका अनुभवी प्राध्यापक संशोधन समन्वयक म्हणून नियुक्त करावे. या समन्वयकावर विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याची व अविष्कार स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची जबाबदारी सोपवावी. सर्व महाविद्यालयांमधून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आविष्कार स्पर्धेमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशा सूचना डॉ.देविदास वायदंडे यांनी दिल्या आहेत.

ह्युमिनिटीज लॅग्वेज अँड फाईन आर्ट्स, कॉमर्स मॅनेजमेंट अँड लॉ, प्युअर सायन्स, ॲग्रीकल्चर अँड ॲनिमल हसबंडरी, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, मेडिसिन अँड फार्मसी या कॅटेगिरीमध्ये स्पर्धेसाठी प्रकल्प सादर करावयाचे आहेत. विद्यापीठाच्या वतीने विभागीय स्तरावरील आविष्कार स्पर्धेचे आयोजन ऑक्टोबर 2025 मध्ये करावयाचे प्रस्तावित आहे. 

-------------- 

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी व प्र कुलगुरू डॉ.पराग काळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आविष्कार स्पर्धेमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. स्पर्धेसाठी खर्च कुठेही कमी पडू नये, यासाठी आविष्कार स्पर्धेच्या निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. यंदा विद्यापीठाला अविष्कार स्पर्धेमधून अधिकाधिक पारितोषिके मिळावी, या दृष्टीने सर्व पातळ्यांवर प्रयत्न केला जात आहे.

- डॉ. देविदास वायदंडे, अध्यक्ष, अविष्कार संशोधन समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ