इंजिनीअरिंगच्या चौथ्या फेरीची गुणवत्ता यादी उद्या जाहीर होणार..
राज्यात इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या कॅप फेरीअखेर केवळ ९५ हजार २५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असून अद्यापही प्रवेशाच्या ८८ हजार ५०७ जागा रिक्त आहेत. ही शेवटची कॅप फेरी असणार आहे. त्यामुळे चौथ्या फेरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Examination) कक्षाने (सीईटी सेल) इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या (Engineering courses) तिसऱ्या कॅप फेरीच्या गुणवत्ता यादीत (Merit list for the third cap round) ९८ हजार ५५ विद्यार्थ्यांना महाविद्यालयांतील जागांचे वाटप केले होते. मात्र, या तिसऱ्या फेरीत महाविद्यालयांतील जागांचे वाटप केलेल्या ३० हजार ४१२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामुळे चौथ्या फेरीसाठी आणखीन ८८ हजार ५०७ उपलब्ध (88 thousand 507 available) आहेत. वेळापत्रकानुसार, चौथ्या फेरीची अंतिम गुणवत्ता यादी उद्या सोमवारी १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; १८ सप्टेंबरपर्यंत मुदत
राज्यात इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या कॅप फेरीअखेर केवळ ९५ हजार २५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असून अद्यापही प्रवेशाच्या ८८ हजार ५०७ जागा रिक्त आहेत. ही शेवटची कॅप फेरी असणार आहे. त्यामुळे चौथ्या फेरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यंदा इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २ लाख १४ हजार एवढ्या विक्रमी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर प्रवेशासाठी १ लाख ८३ हजार ७६० जागा उपलब्ध आहेत. प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी १ लाख १९ हजार २३ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पर्याय निवडून अर्ज भरले होते. त्यातील ९८ हजार ५५ विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांच्या जागांचे वाटप केले होते.
उर्वरित ८८ हजार ५०७ जागांसाठी सीईटी सेलकडून चौथी फेरी होणार असून, ही शेवटची कॅप फेरी असेल. त्यानंतर विद्यार्थ्यांना थेट संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांमध्ये प्रवेश घ्यावा लागेल. चौथ्या फेरीची गुणवत्ता यादी १ सप्टेंबरला जाहीर होणार. विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीत वाटप झालेल्या महाविद्यालयात २ सप्टेंबर ते ४ सप्टेंबरदरम्यान प्रवेश घ्यावा लागेल.
eduvarta@gmail.com