मुंबई विद्यापीठाचा प्रताप:परीक्षा देऊनही डॉक्टर विद्यार्थ्याला दाखवले 'लॉ'च्या परीक्षेला गैरहजर;पुरावा दाखवल्यावर दिले शून्य गुण 

मुंबई विद्यापीठाचा प्रताप:परीक्षा देऊनही डॉक्टर विद्यार्थ्याला दाखवले 'लॉ'च्या परीक्षेला गैरहजर;पुरावा दाखवल्यावर दिले शून्य गुण 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मुंबईतील एक नामांकित डॉक्टर, इतर विषयांची पदवी घ्यावी म्हणून 'लॉ ' ला महाविद्यालयात प्रवेश घेतात. मात्र, विद्यार्थी परीक्षेला गैरहजर (Absence of student examination)असल्याची नोंद विद्यापीठाकडून केली जाते. पण हा लॉ चे शिक्षण घेणारा विद्यार्थी (Law student)परीक्षेला उपस्थित असल्याचे सर्व पुरावे विद्यापीठाला सादर करतो. त्यानंतर विद्यापीठ त्या विद्यार्थला संबंधित विषयात शून्य गुण दिले. हा प्रकार नुकताच मुंबई विद्यापीठात (Mumbai University)उघडकीस आला आहे.

 हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुनील जटानिया (Cardiologist Dr. Sunil Jatania)हे जितेंद्र चौहान कॉलेज ऑफ लॉचे विद्यार्थी आहेत. डॉ. जटानिया हे मुंबईतील चार रुग्णालयांशी संलग्न आहेत. त्यांनी बीएससी, एमबीबीएस, एमडी, डीएम, फेलोशिप, उर्दू भाषेतील प्रमाणपत्र आणि संसर्गजन्य रोग, बालरोग, हृदयरोग यांसारखे सुमारे 25 प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. सध्या ते कायदा आणि एमए (मानसशास्त्र) या विषयाचा अभ्यास करत आहेत. 

 डॉ. जटानिया यांना  सिव्हिल प्रोसिजर कोडमधील पाचव्या सेमिस्टरच्या पेपरला  गैरहजर असल्याचे दाखवण्यात आले होते. त्यांनी उपस्थितीचा पुरावा दिल्यानंतरही त्यांना मार्कशीटमध्ये शून्य गुण  मिळाले. विशेष म्हणजे इतर सर्व विषयांत त्यांना ६५ ते ८५ गुण मिळाले आहेत. डॉ. जटानिया यांनी विद्यापीठाला परीक्षा केंद्रावरील उपस्थिती पत्रक आणि त्याच्या हॉल तिकिटावर निरीक्षकांची स्वाक्षरी सादर केली होती.

या विषयी माध्यमांशी बोलताना डॉ.  जटानिया म्हणाले, " रिपोर्ट कार्ड पाहून मला खूप धक्का बसला. मला कायद्याच्या पदवीची गरज नाही, पण घडलेल्या घडामोडींमुळे मुंबई विद्यापीठात शिक्षण आणि करिअरसाठी पदवी मिळवणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल मला काळजी वाटू लागली आहे.”

डॉ.जटानिया यांनी पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी अर्ज केला. पण अद्याप विद्यापीठाकडून काहीही कारवाई झालेली नाही.  गुरुवारपासून  सहाव्या सेमिस्टरच्या परीक्षा सुरू होत आहेत.