अजब प्रकार ! मुख्याध्यापकाच्या विरोधात शिक्षणाधिकाऱ्याचे उपोषण

इतिहासात पहिल्यांच हिंगोली जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाच्या कारभाराला कंटाळून खुद्द जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारीच शाळेच्या समोर आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसे पत्र देखील शाळा व्यवस्थापनाला देण्यात आले आहे. येरवी प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण, मोर्चे आणि आंदोलन करणाचे मुख्याध्यापक, शिक्षण आता हे उपोषण कसे हताळतात हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे .

अजब प्रकार ! मुख्याध्यापकाच्या विरोधात शिक्षणाधिकाऱ्याचे उपोषण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

आजपर्यंत तुम्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला सामान्य नागरीक, पालक, शिक्षण, मुख्याध्यापक किंवा संस्थाचालक कंटाळल्याचे ऐकले असेल. त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी मोर्चे, आंदोलने, उपोषणे झालेली देखील पाहिली असतील. मात्र, इतिहासात पहिल्यांच हिंगोली जिल्हा परिषद शाळेतील (Hingoli Zilla Parishad School) मुख्याध्यापकाच्या कारभाराला कंटाळून खुद्द जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारीच (Education officer to go on hunger strike) शाळेच्या समोर आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसे पत्र देखील शाळा व्यवस्थापनाला देण्यात आले आहे. येरवी प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण, मोर्चे आणि आंदोलन करणाचे मुख्याध्यापक, शिक्षण आता हे उपोषण कसे हताळतात हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे . मराठवाड्याच्या हिंगोलीत चक्क शिक्षणाधिकारीच शाळेच्या विरोधात उपोषण करत असल्याने हा राज्यभर चर्चेचा विषय (A topic of discussion across the state) बनला आहे.

MPSC : (RTO AMVI)च्या साडे चारशे जागा रिक्त, जाहिरातीतून संवर्गच गायब; विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर

हिंगोली शहराच्या जवळ असलेल्या अंतुले नगर जिल्हा परिषद शाळेतील हा संपूर्ण प्रकार आहे. या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक मंडळी शाळेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी ऑपरेशन निपुण, एक पेड मा के नाम, विद्यार्थी सुरक्षा समिती अशा अनेक उपक्रमांमध्ये मागे पडल्याचे सांगत शिक्षण अधिकाऱ्यांनी हा उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. शाळेतील उपक्रम राबविण्यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या लेखी पत्र दिले बैठक घेतल्या मात्र शाळा प्रशासन कशालाच जुमानत नसल्याने शिक्षणाधिकाऱ्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

एवढेच काय तर खुद्द राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील हिंगोलीत बैठक घेतली. मात्र मुख्याध्यापक ऐकत नसल्याने आपल्यावर ही वेळ आल्याचे शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांनी सांगितले आहे. शिक्षणाधिकारी म्हणून शाळा व्यवस्थापनावर नियमानुसार कार्यवाही करून मुख्याध्यापकाला निलंबित केले. तर राज्यात शिक्षकांच्या संघटना लगेचच मोर्चा काढतात आणि त्यामुळे आपण शासनाच्या नियमांचे पालन व्हावे, यासाठी गांधीगीरी मार्गाने हे आंदोलन करत असल्याचे दिग्रसकर यांनी म्हटले आहे.