"...म्हणून विद्यार्थी संख्या घटली," उच्च शिक्षणमंत्र्यांची सभागृहात कबुली 

शिवाजी विद्यापीठाच्या १४ हून अधिक विभागांतील विद्यार्थीसंख्या घटली असून, विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचवली जात नाही, म्हणून ही संख्या कमी झाल्याची कबुली उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

"...म्हणून विद्यार्थी संख्या घटली," उच्च शिक्षणमंत्र्यांची सभागृहात कबुली 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University Kolhapur) १४ हून अधिक विभागांतील विद्यार्थीसंख्या घटली (The number of students decreased) असून, विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचवली जात नाही. त्यामुळे ही संख्या कमी झाल्याची कबुली उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी विधान परिषदेत दिली. आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी याबाबतचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला होता. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पाटील यांनी ही कबुली दिली. 

शिवाजी विद्यापीठात सध्या २५० हून अधिक अभ्यासक्रम शिकवले जातात. मात्र, रोजगाराच्या संधींशी सांगड न घातल्याने १४ अधिक विभागांत २०२३-२४ या वर्षात प्रवेश क्षमतेइतकेही विद्यार्थी मिळाले नाहीत. मानव्यशास्त्र शाखेतही विद्यार्थीसंख्या कमी होत आहे,हा धागा धरून आमदार पाटील यांनी त्याकडे लक्ष वेधले होते.
 
सध्याचे अभ्यासक्रम कालसुसंगत नसल्याने नव्या शैक्षणिक धोरणात ज्या पद्धतीने बदल अपेक्षित आहेत त्या गतीने बदल करून हे अभ्यासक्रम रोजगाराभिमुख करण्यासाठी काय उपाययोजना केली आहे, असा प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित केला. यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठाच्या २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेचा आढावा समितीच्या अहवालानुसार १४ हून अधिक विभागांतील अभ्यासक्रमांना प्रवेश क्षमतेपेक्षाही कमी प्रवेश झाल्याची कबुली दिली. 

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये व संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण केंद्रांची संख्या वाढल्याने त्या महाविद्यालयांमधून विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.