कमवा व शिका योजनेच्या मानधन वाढीत सुप्रिया सुळेंची उडी 

कमवा आणि शिका ही योजना गरजू विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असून या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पुर्ण केले आहे.यातून मिळणारा मोबदला वाढविल्यास याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.

कमवा व शिका योजनेच्या मानधन वाढीत सुप्रिया सुळेंची उडी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (Savitribai Phule Pune University) राबविल्या जात असलेल्या कमवा व शिका योजनेच्या (earn and learn scheme) मानधनात वाढ करावी,अशी मागणी अधिकसभा सदस्य ,विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.मात्र,राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी देखील विद्यार्थ्यांना मानधनात वाढ करावी, अशी मागणी केली आहे.त्यामुळे विद्यापीठ प्रशासन आता यावर गांभीर्यपूर्वक विचार करणार का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा : शिक्षण धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना

विद्यापीठाचे अधिसभा सदस्य दादाभाऊ शिनलकर यांनी अधिसभेसमोर कमवा व शिका मानधन वाढीचा प्रस्ताव ठेवला होता.अधिसभेत तो मंजूर करण्यात आला होता.मात्र,पुढे त्यावर कोणतेही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे दादाभाऊ  शिनलकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.मात्र,अद्याप त्यावर सकारातींक हालचाली झाल्या नाहीत.विद्यार्थ्यांना सध्या ४५ रुपये मानधन दिले जाते त्यात ६० रुपयांपर्यंत वाढ करावी,  अशी मागणी केली जात आहे.परंतु, ही मागणी मान्य केल्यास विद्यापीठावर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कमवा आणि शिकवा योजनेत प्रतितास रुपये ४५ एवढी रक्कम दिली जाते. परंतु ही रक्कम अतिशय कमी आहे. त्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे. ही रक्कम किमान ६० रुपये प्रतितास असणे आवश्यक आहे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.कमवा आणि शिका ही योजना गरजू विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असून या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पुर्ण केले आहे.यातून मिळणारा मोबदला वाढविल्यास याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.तरी शासनाने या योजनेसाठीचा निधी वाढवून देण्यासंबंधी सकारात्मक विचार करण्याबाबत निर्णय घ्यावा,अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाद्वारे केली आहे.
---------------------------

'' कमवा व शिका योजनेत काम करून अनेक गरीब विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करतात.मात्र, विद्यापीठाकडे या विद्यार्थ्यांना देण्यासाठी योग्य काम नाही.त्यामुळे मानधन वाढीबाबत विद्यापीठ सकारात्मक नसल्याचे दिसून येते. त्यामुळे विद्यापीठाने प्रथमत: या विद्यार्थ्यांच्या कामातून उत्पन्न मिळेल,अशी कामे निर्माण करावीत.त्यामुळे मानधनात  प्रतितास ६० रुपये नाही तर त्यापेक्षा अधिक वाढ करता येईल."
-  संतोष ढोरे , माजी अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ