इंद्रायणीनगर प्रियदर्शनी सीबीएसई स्कूलला स्वच्छतेसाठीचा राज्यस्तरीय पुरस्कार

इंद्रायणीनगर प्रियदर्शनी सीबीएसई  स्कूलला स्वच्छतेसाठीचा राज्यस्तरीय पुरस्कार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
 
 गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवणाऱ्या भोसरी येथील इंद्रायणीनगर परिसरातील प्रियदर्शनी स्कूल अँड जूनियर कॉलेजला (सीबीएसई)स्वच्छतेसाठीचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यभरातील 64 हजार 198 शाळांममधून प्रियदर्शनी स्कूलची या पुरस्काराठी निवड झाल्याने सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहेत.या उपक्रमातील सहभागी निवडक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्वच्छता मॉनिटर ओळखपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

 प्रॉजेक्ट लेट्स चेंज (Let’s change )अंतर्गत स्वच्छता मॉनिटर या उपक्रमात राज्यातील 64 हजार 198 शाळांनी सहभाग घेतला होता तर  ५९ लाख ३१ हजार ४१० विद्यार्थ्यांनी उपक्रमांसाठी नोंदणी केली होती.'निष्काळजी मुक्त महाराष्ट्र' हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील १०० शाळा स्वच्छतेसाठीच्या पुरस्करासाठी निवडण्यात आल्या असून त्यात पिंपरी-चिंचवड विभागात  इंद्रायणीनगर, प्रियदर्शनी स्कूल अँड जूनियर कॉलेजचा (सीबीएसई ) समावेश आहे. 

शालेय शिक्षण विभागाच्या प्रॉजेक्ट लेट्स चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनिटर या महत्वाकांक्षी उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई येथे हस्ते झाले होते. या कार्यक्रमासाठी प्रियदर्शनी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला (सीबीएससी ) निमंत्रित करण्यात आले होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना Let’s change (लेट्स चेंज ) हा चित्रपट दाखवण्यात आला. त्यातून प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी मॉनिटरगिरी करायला सुरुवात केली. या प्रकल्पात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवाचे मजेशीर व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केले. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.गायत्री जाधव यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर बनवून जागोजागी अस्वच्छता करणाऱ्या निष्काळजी लोकांना थांबवण्यास प्रोत्साहित केले. 

शाळा समन्वयक अश्विनी मेहेत्रे व सर्व वर्ग शिक्षकांनी नियमित विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून त्यांचे अनुभव ऐकून त्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उत्साही उत्स्फूर्त सहभागामुळे शाळेची प्रोजेक्ट लेट्स चेंज या उपक्रमात राज्य पुरस्कारासाठी निवड झाली. शाळा पूर्वीपासून स्वच्छतेबाबत आग्रही आहे.निष्काळजीपणे कचरा कोठेही टाकू नये आणि त्याबाबत जनजागृती व्हावी म्हणून राज्याने मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमात सहभागी होऊन प्रियदर्शनी स्कूलला स्वच्छता जागृतीची आणखी एक संधी मिळाली. शाळेमधून विद्यार्थ्यांवर स्वच्छतेचे संस्कार होणे ही चांगली बाब असून दुसऱ्या टप्प्यात देखील शाळा अग्रेसर राहणार आहे. शाळेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त तरुणा सिंग आणि डॉ. राजेंद्र सिंग सर, नरेंद्र सिंग सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.गायत्री जाधव  (CBSE) आणि मुख्याध्यापिका अर्पिता दिक्षीत (SSC) यांनी मुलांनी केलेल्या कामाचे कौतुक केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.