राज्य शिक्षकेतर महामंडळ निवडणुकीत शिवाजी खांडेकरांची सत्ता

खांडेकरांच्या नेतृत्वाखाली महामंडळाच्या निवडणुकीत १४ जागा बिनविरोध निवडून आल्या असून उर्वरीत ३ जागांवरती झालेल्या निवडणूक प्रक्रियेत तीनही उमेदवार बहुसंख्य मतांनी विजयी झाले आहेत

राज्य शिक्षकेतर महामंडळ निवडणुकीत शिवाजी खांडेकरांची सत्ता
Shivaji Khandekar

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ यांची त्रैवार्षिक निवडणूक पुण्यातील राष्ट्र सेवा दलाच्या रावसाहेब पटवर्धन विद्यालय व ज्युनियर कॉलेज, साने गुरुजी स्मारक येथे पार पडली.या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवाजी खांडेकर यांच्यावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विश्वास कायम ठेवत एकहाती सत्ता दिली.

खांडेकरांच्या नेतृत्वाखाली महामंडळाच्या निवडणुकीत १४ जागा बिनविरोध निवडून आल्या असून उर्वरीत ३ जागांवरती झालेल्या निवडणूक प्रक्रियेत तीनही उमेदवार बहुसंख्य मतांनी विजयी झाले आहेत.यामध्ये अनिल रामचंद्र माने (सातारा) अध्यक्षपदी बिनविरोध, शिवाजी चंद्रकांत खांडेकर (पुणे) सरकार्यवाह पदी सलग चौथ्यांदा बिनविरोध ,मोरेश्वर इसनाजी वासेकर (चंद्रपूर) कार्याध्यक्ष बिनविरोध, रवींद्र राजाराम गवळी (सांगली) उपाध्यक्ष बिनविरोध, सरिता विजयकुमार कुलकर्णी(नांदेड) बिनविरोध,प्रिया प्रमोद पवार ( मुंबई) उपाध्यक्ष बिनविरोध,देविदास सोनाजी पंडागळे (मुंबई शहर) मुंबई उपकार्यवाह बिनविरोध,गोवर्धन गोविंद पांडूळे (अहमदनगर) पुणे उपकार्यवाह बिनविरोध,

गजानन द्वारकानाथ नानचे (सिंधुदुर्ग)  कोल्हापूर उपकार्यवाह बिनविरोध,जिवनदास रघुनाथ सार्वे (भंडारा) उपकार्यवाह बिनविरोध, विजय महादेव ताले (अकोला) अमरावती उपकार्यवाह बिनविरोध,राजेश्वर शिवराज चापुले (लातूर)  लातूर उपकार्यवाह बिनविरोध, श्रीकांत जोतिराम पावणे (सोलापूर) प्रसिध्दी प्रमुख, रामचंद्र चिंतामणी केळकर (रत्नागिरी) अंतर्गत हिशोबनिस बिनविरोध श्रीधर जयवंत गोंधळी ( कोल्हापूर) उपाध्यक्ष विजयी मते १३४ ,  खैरुद्दीन नजरुद्दिन सय्यद (धाराशिव) उपाध्यक्ष विजयी मते १३१ ,नाशिक उपकर्यवाह पदी ज्ञानेश्वर पंडीत महाले (नंदुरबार) विजयी मते १२२ , संभाजीनगर उपकर्यवाह पदी संजय सदाशिव कावळे (संभाजीनगर)  विजयी मते १२९ निवडून आले आहेत. 

जुनी पेन्शन योजना,शिक्षकेतर सेवकांचे प्रश्न,शैक्षणिक धोरण व त्यातील अडचणी सोडवणेस राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या वतीने मोठया ताकतीने लढा उभारुन न्याय देणार असल्याचे नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले.यावेळी राज्य महामंडळाचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून प्रसन्न कोतुळकर यांनी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रमेश इंगवले, देवेंद्र पारखे , इम्राण मुल्ला, निलेश पारकर, रामगोंडा खोत यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी पुणे जिल्हाध्यक्ष विनोद गोरे, सुखदेव कंद, माजी अध्यक्ष नारायण गवळी, बाबा गडगे, आप्पासाहेब खराडे, भाऊसाहेब थोटे, पांडुरंग चिंचोलकर, सतिश नाडगौडा, एस एम पाटील, गोपाळ पेंडकर आदी पदाधिकारी, राज्यातील सर्व जिल्हाअध्यक्ष, सचिव, पदादिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे जिल्हाध्यक्ष विनोद गोरे यांनी आभार मानले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO