Ssc Result 2024 : राज्याचा दहावीचा निकाल 95.81 टक्के; निकाल 1.98 टक्क्यांनी वाढला

राज्याच्या दहावीचा एकूण निकाल 95.81 टक्के लागला आहे. तर नेहमी प्रमाणे यंदाही निकालात मुलींचीच सरशी आहे.

Ssc Result 2024 : राज्याचा दहावीचा निकाल 95.81 टक्के; निकाल 1.98 टक्क्यांनी वाढला

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

Ssc Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल (10th Result) बेस्ट ऑफ फाईव्ह (Best of five) पध्दतीने जाहीर करण्यात आला आहे. राज्याच्या दहावीचा एकूण निकाल 95.81 टक्के लागला आहे. नेहमी प्रमाणे यंदाही निकालात मुलींचीच सरशी आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.01 लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी 94.56 आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत एकूण निकालात 1.98 टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी राज्याचा दहावीचा एकूण निकाल 93.83 टक्के इतका लागला होता. मुलींचा निकाल मुलांच्या निकालांपेक्षा 2.56 टक्के अधिक आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi)यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दहावीच्या निकालाची घोषणा केली.यावेळी राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्यासह राज्य मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. 18 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. 

विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता खाली दिलेल्या लिंक व निकाल पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

१. https://mahresult.nic.in
२. http://sscresult.mkcl.org
३. https://sscresult.mahahsscboard.in
४. https://results.digilocker.gov.in
५. https://results.targetpublications.org
६. https://www.tv9marathi.com