नगर जिल्हा बँक परीक्षेच्या निकालात घोटाळा, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक (Ahilyanagar District Cooperative Bank) भरती परीक्षेचा निकाल (Recruitment exam results) नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निकालात घोटाळा (Bank recruitment scam) करण्यात आला असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने (Competitive Examination Coordination Committee) केला आहे. समितीने आपल्या 'एक्स'   सोशल मिडिया अकांउटवर पोस्ट शेअर करत काही राजकीय नेत्यांनी टॅग केले आहे. 

नगर जिल्हा बँक परीक्षेच्या निकालात घोटाळा, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक (Ahilyanagar District Cooperative Bank) भरती परीक्षेचा निकाल (Recruitment exam results) नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निकालात घोटाळा (Bank recruitment scam) करण्यात आला असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने (Competitive Examination Coordination Committee) केला आहे. समितीने आपल्या 'एक्स'   सोशल मिडिया अकांउटवर पोस्ट शेअर करत काही राजकीय नेत्यांनी टॅग केले आहे. 

सध्याच्या काळात पण महाराष्ट्रामध्ये असे घोटाळे होत असेल तर राज्यसरकारने परीक्षा न घेतलेल्या चांगले आहे. किमान युवकांचे उमेदीचे वर्ष तरी वाया जाणार नाहियेत. सत्ताधारी तसेच विरोधकांना सुद्धा माहीत आहे घोटाळे झाले आहेत तरी सर्व जण शांत आहे का तर काही जिल्ह्यातील बँका ह्या विरोधकांच्या ताब्यात आहे. तेरी भी चूप मेरी भी चूप असे प्रकार सध्या सुरू आहे यात भरडला जातोय तो गरिबांचे, शेतकऱ्यांचे प्रामाणिक अभ्यासू युवक का तर त्याचे खायचे वांदे आहेत तो कुठून आणणारा 15 लाख. आपल्या महाराष्ट्रात असले प्रकार सुरू आहेत हे पाहून लाज वाटत आहे, असे म्हटले आहे.

सर्वांनी जागा वाटून घेतल्या आणि कोण कोण निवडले गेले आहेत त्यांची नावे सुद्धा लावली नाहियेत का तर फक्त यांचे पाप झाकून ठेण्यासाठी. नावे समोर आली तर पूर्ण महाराष्ट्रला समजेल किती घोटाळा केला आहे ते. आमदार रोहित पवार यांना टॅग करत म्हटले आहे. आपण आमदार असणाऱ्या जिल्ह्यातील जिल्हा बँकेत खूप मोठा घोटाळा झाला आहे याकडे थोड लक्ष द्या. विरोधक हा सत्ताधारी लोकांनी केलेले घोटाळे बाहेर काढण्यासाठी असतो ते काम करा, असे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने म्हटले आहे.