सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जेएनयु झाले का ? 

गेल्या काही दिवसांत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घडलेल्या घटनांमुळे आठ गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु, ही कोणत्याही विद्यापीठासाठी चांगली बाब नाही,असे प्रतिपादन पुण्याचे अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जेएनयु झाले का ? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सर्व जाती धर्माचे व विचाराधारेचे विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) शिक्षण घेतात. मात्र, काही लोकांमुळे विद्यापीठाचे वातावरण बिघडत आहे. त्याचा परिणाम चांगला अभ्यास करणाऱ्या कुटुंबातील मुलांवर होत आहे. तसेच पूर्वीचे जेएनयु (JNU)आणि आत्ताचे जेएनयु यात फरक असून अनेक पालक आपल्या मुलांना जेएनयुमध्ये पाठवण्यास घाबरतात. पुणे विद्यापीठात (Pune University) गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या वातावरणामुळे आपल्या विद्यापीठाचे सुध्दा जेएनयु झाले आहे का ? अशी विचारणा केली जाऊ लागली आहे. त्याचाप्रमाणे गेल्या काही दिवसांत विद्यापीठात घडलेल्या घटनांमुळे आठ गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु, ही कोणत्याही विद्यापीठासाठी चांगली बाब नाही,असे प्रतिपादन पुण्याचे अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा (Additional Police Commissioner Ranjan Kumar Sharma ) यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निर्माण झालेल्या तणावपूर्ण वाटावरणानंतर विद्यापीठ प्रशासन व पोलीस प्रशासनातर्फे सर्व विद्यार्थी संघटनांची समन्वय बैठकीचे घेण्यात आली.यावेळी रंजन शर्मा बोलत होते.कार्यक्रमास पोलीस आयुक्त रितेश कुमार , विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, प्र - कुलगुरू डॉ.पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ.विजय खरे, माजी पोलीस अधिकारी जयंत उमराणीकर आदी उपस्थित होते. 

रंजन कुमार शर्मा म्हणाले,  विद्यापीठात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून पुणे विद्यापीठाच्या प्रतिमेला धक्का बदला आहे.विद्यार्थ्यांनी विद्यापीठाने तयार केलेल्या एसओपी प्रमाणे केले तर विद्यापीठाच्या प्रतिमेला गालबोट लागणार नाही.विद्यापीठात वेगवेगळ्या विचारधारा असणारे विद्यार्थी शिक्षण घेतात.आपण त्या सर्वांना सर्वांना बरोबर घेऊन जायाला हवे.सर्वांनी विद्यापीठाचे नाव खराब होणाऱ्य नाही खबरदारी घ्यालया हवी.
कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी मागील परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये सहभागी होताना विद्यापीठाची प्रतिमा कशी उंचावेल यासाठी एकत्रित काम करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, या बैठकीत विविध सर्व संघटनांचे वैचारिक स्वातंत्र्य अबाधित राखून विद्यापीठाशी संलग्नित असलेले त्यांचे प्रश्न मार्गस्थ करण्यासाठी नवीन कार्यप्रणाली करण्याचे ठरले.लोकशाही मार्गाने विद्यापीठातल्या विविध प्रश्नांबाबत विविध संघटनांमार्फत होणारी आंदोलने,सभा,कार्यक्रम आदींसाठी सर्वसंमतीने कार्यप्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर यांनी केले.यावेळी व्यवस्थापन परिसहसदेचे सदस्य डॉ. नितिन घोरपडे, डॉ. देविदास वायदंडे,बागेश्री मंठाळकर, तसेच अधिसभा सदस्य प्रसेनजित फडणवीस, पोलीस अधिकारी व कर्मचारी,विद्यापीठाचे सुरक्षा संचालक सुरेश भोसले व सुरक्षा कर्मचारी आदी उपस्थित होते.