एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (Staff Selection Commission) SSC केंद्रीय पोलिस दल (Central Police Force) CPO 2024 परीक्षेच्या पहिल्या पेपरची अंतिम उत्तर की आणि गुण प्रसिद्ध झाले आहेत. (The final answer key and marks of of the exam has been released) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील उपनिरीक्षक (SI) परीक्षा 2024 (पेपर-I) साठी बसलेले उमेदवार SSC, ssc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अंतिम उत्तर की तपासू शकतात. ही परीक्षा 27 ते 29 जून दरम्यान घेण्यात आली होती.
एसएससी अंतिम उत्तर की सोबत, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल परीक्षा 2024 च्या पहिल्या पेपरच्या प्रश्नपत्रिका देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. SSC CPO उमेदवार 7 नोव्हेंबर 2024 पर्यंत अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या प्रश्नपत्रिका तपासू शकतात.
SSC CPO अंतिम उत्तर डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC च्या अधिकृत वेबसाईट ssc.gov.in वर जा.
'पेपर I pdf साठी SSC SI या लिंकवर क्लिक करा. यानंतर, नवीन PDF फाईल उघडण्यासाठी दिलेल्या लॉगिन लिंकवर क्लिक करा. लिंकवर आवश्यक माहिती भरल्यानंतर, अंतिम उत्तर की तुमच्या समोर येईल. तुमची एसएससी अंतिम उत्तर की काळजीपूर्वक तपासा आणि पृष्ठ डाउनलोड करा. तुमच्या उत्तर की चा प्रिंटआउट घ्या आणि भविष्यासाठी तुमच्याकडे ठेवा.