ब्रिटननंतर आता ऑस्ट्रेलियन विद्यापीठेही भारतात सुरू करणार कॅम्पस 

यूजीसीच्या नियमांनुसार अनेक परदेशी विद्यापीठांनी अर्ज केले आहेत. QS जागतिक क्रमवारीत स्थान मिळवणाऱ्या आणि जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विद्यापीठांना प्राधान्य दिले जाईल. अलीकडेच भारताच्या शिक्षणमंत्र्यांनी अनेक ऑस्ट्रेलियन विद्यापीठांच्या प्रतिनिधींशी याबाबत  चर्चा केली आहे.

ब्रिटननंतर आता ऑस्ट्रेलियन विद्यापीठेही भारतात सुरू करणार कॅम्पस 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

जागतिक क्रमवारीत स्थान मिळवलेल्या ऑस्ट्रेलियातील अनेक प्रसिद्ध विद्यापीठांचे कॅम्पस भारतात लवकरच सुरू होऊ शकतात.  (Campuses of many famous universities of Australia may soon open in India) केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) आणि ऑस्ट्रेलिया सरकारचे शिक्षण मंत्री जेसन क्लेअर (Australian Education Minister Jason Clair) दोघांची यावर सहमती झाली आहे. (both have agreed) प्रधान सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून उच्च शिक्षण तसेच शालेय स्तरावरील सहकार्याबाबत दोघांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे.

देशात पहिले परदेशी कॅम्पस ब्रिटनच्या साउथॅम्प्टन विद्यापीठाचे असेल, ज्यामध्ये जुलै 2025 पासून अभ्यास सुरू होईल. पुढील वर्षापासून  अनेक परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस भारतात सुरू होऊ शकतात. यूजीसीच्या नियमांनुसार, अनेक परदेशी विद्यापीठांनी यासाठी अर्ज केले आहेत. QS जागतिक क्रमवारीत स्थान मिळवणाऱ्या आणि जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विद्यापीठांना प्राधान्य दिले जाईल. अलीकडेच भारताच्या शिक्षणमंत्र्यांनी अनेक ऑस्ट्रेलियन विद्यापीठांच्या प्रतिनिधींशी याबाबत चर्चा केली आहे.

ऑस्ट्रेलियन इंटरनॅशनल एज्युकेशन कॉन्फरन्सला संबोधित करताना प्रधान म्हणाले की, 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने (NEP 2020) भारताचे  शैक्षणिक केंद्र बदलले आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आणि भारतात ऑस्ट्रेलियन विद्यापीठांचे अधिक कॅम्पस उघडण्यासाठी चर्चा झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील सहकार्य हा भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांचा पाया आहे. भारतात ऑस्ट्रेलियन विद्यापीठांच्या कॅम्पसची स्थापना ही फक्त सुरुवात आहे. अजूनही खूप काही साध्य करता येईल.