SPPU Election : व्यवस्थापन परिषदेच्या दोन जागांसाठी सात जण मैदानात, चौघांचे अर्ज बाद

विद्या परिषदेने तिच्या सदस्यांमधून व्यवस्थापन परिषदेवरून दोन सदस्य निवडून द्यायचे आहे. त्यासाठी एकूण ११ जणांचे अर्ज आले होते. त्यामध्ये सर्वाधिक सात अर्ज अध्यापक गटासाठी होते.

SPPU Election : व्यवस्थापन परिषदेच्या दोन जागांसाठी सात जण मैदानात, चौघांचे अर्ज बाद

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) व्यवस्थापन परिषदेवर (Management Council) विद्या परिषदेतून दोन सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून सोमवारी अर्जांची छाननी पार पडली. यामध्ये चार जणांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अध्यापक गटातून तिघांमध्ये तर महिला गटातून चौघांमध्ये निवडणूक होणार आहे. (SPPU Election)

 

विद्या परिषदेने तिच्या सदस्यांमधून व्यवस्थापन परिषदेवरून दोन सदस्य निवडून द्यायचे आहे. त्यासाठी एकूण ११ जणांचे अर्ज आले होते. त्यामध्ये सर्वाधिक सात अर्ज अध्यापक गटासाठी होते. त्यापैकी चौघांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. विद्या परिषदेवर निर्वाचित अध्यापक असल्याची अट पूर्ण करीत नसल्याच्या कारणास्तव हे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

 

अध्यापक गटात आता तिघांचे अर्ज उरले आहेत. तर महिला गटामध्ये चार अर्ज प्राप्त झाले होते. ते चारही अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत.  दोन महिला उमेदवारांचे दोन्ही गटातून अर्ज आहेत. दोन्ही गटातून प्रत्येक एका सदस्याची निवड केली जाणार आहे.

शासनाचा उफराटा कारभार; कनिष्ठ पदासाठी पदवी अन् वरिष्ठ पदासाठी पदविका पात्रता, भरती वादात

अध्यापक गटातील ग्राह्य अर्ज

१. संगिता विजय जगताप (पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी)

२. राजश्री गहिनीनाथ जायभाय (आदर्श शिक्षण मंडळीचे आदर्श महाविद्यालय, कर्वे रस्ता)

३. तुकाराम बारकु रोंगटे (मराठी विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

 

महिला गटातील ग्राह्य अर्ज

१. ज्योत्स्ना गजानन एकबोटे (प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटी, पुणे)

२. संगिता विजय जगताप (पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी)

३. राजश्री गहिनीनाथ जायभाय (आदर्श शिक्षण मंडळीचे आदर्श महाविद्यालय, कर्वे रस्ता)

४. वीणा मधुसुदन नरे (समाजश्री प्रशांतदादा हिरे कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय, नाशिक)

 

अध्यापक गटातील अग्राह्य अर्ज

१. बापू सोनू जगदाळे (महात्मा गांधी विद्यामंदीरचे लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, नाशिक)

२. हरिश्चंद्र गोविंद नवले (तत्वज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

३. शेख आफताब अन्वर मकबूल (अंजुमन खैरुल इस्लाम पुना कॉलेज, पुणे)

४. नितीन रघुनाथ झावरे (ग्रामोदय ट्रस्टचे संगमनेर आरआयआयएम-द अकॅडमी ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, पुणे)

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k