सुधारित विषय योजना व तासिका विभागणी वेळापत्रक प्रसिद्ध
हे निर्देश इयत्ता पहिली साठी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासूनच अंमलात येणार आहेत. इयत्ता दुसरीसाठी नवीन पाठ्यपुस्तके लागू झाल्यावर यामधील निर्देश बंधनकारक राहतील. इतर इयत्तांसाठी सुद्धा वेळापत्रक याप्रमाणे ठेवण्यास हरकत नाही जेणेकरुन शाळेतील घंटा / Bell वाजविण्याचे नियोजन सुकर होईल.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यामध्ये नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी (Implementation of new curriculum) सन २०२५-२६ पासून टप्प्या टप्प्याने करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. सन २०२५-२६ पासून इ.१ली साठीच्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये (Marathi and English medium schools) तिसरी भाषा असेल असे नमूद केलेले आहे. त्यास अनुसरुन इयत्ता पहिलीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू झाल्याने सुधारित विषययोजना, तासिका विभागणी व वेळापत्रक (division and timetable) लागू करण्यात आले आहे.
हे निर्देश इयत्ता पहिली साठी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासूनच अंमलात येणार आहेत. इयत्ता दुसरीसाठी नवीन पाठ्यपुस्तके लागू झाल्यावर यामधील निर्देश बंधनकारक राहतील. इतर इयत्तांसाठी सुद्धा वेळापत्रक याप्रमाणे ठेवण्यास हरकत नाही जेणेकरुन शाळेतील घंटा / Bell वाजविण्याचे नियोजन सुकर होईल. इतर वर्गासाठी त्यांच्या विषयरचनेप्रमाणे विषयनिहाय तासिकांची संख्या याआधी निर्गमित केलेल्या सूचनांप्रमाणे ठेवावी. यासोबत नमुन्यादाखल देण्यात आलेले शाळेसाठीचे साप्ताहिक वेळापत्रक हे एक उदाहरण असून त्यामध्ये विषय तासिकेच्या क्रमवारीमध्ये व शाळा सुरु करण्याच्या वेळेमध्ये शाळांना बदल करता येतील. परंतु विषयनिहाय अध्ययन-अध्यापनाचा साप्ताहिक व वार्षिक घड्याळी तासांचा कालावधी कोणत्याही विषयासाठी शाळा स्तरावर कमी करता येणार नाही.
वेळापत्रकामध्ये काही ठिकाणी 2 तासिका जोडून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये तोडी-लेखी-प्रात्यक्षिक-सराव असे वैविध्यपूर्ण अध्यापन होणे अपेक्षित आहे. पूर्णवेळ शाळांमधील अध्यापन कालावधी व दोन सत्रात भरणाऱ्या शाळांमधील अध्यापना कालावधी समान राहील याची दक्षता घेतलेली आहे. केवळ परिपाठ, मधली सुट्टी, अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP-Additional Enrichment Period) यांच्या कालावधीमध्ये वेळेच्या उपलब्धतेनुसार तफावत असू शकेल. अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) ह्या विद्यार्थ्यांना कोणत्याही अभ्यास विषयात सक्षम करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शनासाठी आहेत. यामध्ये उपचारात्मक अध्यापन, स्पर्धा परीक्षा तयारी, सराव इत्यादी उपक्रम घेता येतील. अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (AEP) कोणत्या विषयासाठी आवश्यक आहे हे शाळेतील गरजेनुसार ठरवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
eduvarta@gmail.com