LLB 3 वर्ष CAP समुपदेशन 2025 चे वेळापत्रक जाहीर
राज्यभरातून या परीक्षेसाठी ९४ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७४ हजार ६२१ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित होते. ही उपस्थिती ७८.९६ टक्के एवढी होती. या परीक्षेचा निकाल २० जून रोजी सीईटी कक्षातर्फे जाहीर करण्यात आला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Examination) कक्षातर्फे (सीईटी कक्ष) राबवल्या जाणाऱ्या एलएलबी तीन वर्षे (LLB 3 years) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू (Admission process begins) करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठीची सीईटी दिलेल्या ७४ हजार ६२१ विद्यार्थ्यांना १० जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार (Applications can be submitted until July 10th) आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग-इनमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करायची आहे.
एलएलबी तीन वर्षे अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा २ आणि ३ मे रोजी पाच सत्रांमध्ये घेण्यात आली. दोन मे रोजी तीन सत्रे आणि तीन मे रोजी दोन सत्रे आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातून या परीक्षेसाठी ९४ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७४ हजार ६२१ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित होते. ही उपस्थिती ७८.९६ टक्के एवढी होती. या परीक्षेचा निकाल २० जून रोजी सीईटी कक्षातर्फे जाहीर करण्यात आला.
5 वी, 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल कधी; पुन्हा चौथी, सातवीसाठी परीक्षा घेणार का?
त्यानंतर आता सीईटी कक्षाने या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना १० जुलैपर्यंत लॉग-इनमधून अर्ज नोंदणी करायची आहे. तसेच १ ते १५ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांच्या अर्जाची, कागदपत्रांची ऑनलाईन तपासणीही करण्यात येणार आहे. फेऱ्यांचे वेळापत्रक सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येणा असल्याचे सीईटी कक्षाने स्पष्ट करण्यात आले आहे.
eduvarta@gmail.com