प्राध्यापक भरतीसाठी सुमारे 4 हजार उमेदवारांची नोंदणी 

प्राध्यापक भरतीसाठी सुमारे 4 हजार उमेदवारांची नोंदणी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (Savitribai Phule Pune University) विविध विभागातील रिक्त असलेल्या 111 पदांसाठी भरती प्रक्रिया (professor recruitment) राबवली जात असून 15 जानेवारीपर्यंत तब्बल 4 हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. येत्या 31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली असून सुमारे 5 हजार पात्र उमेदवारांचे उमेदवारांचे अर्ज प्राप्त होतील,असा अंदाज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी (Vice Chancellor Dr. Suresh Gosavi) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

विद्यापीठातील प्राध्यापक पदाच्या भरतीची अनेक उमेदवार प्रतीक्षा करत होते.नवीन वर्षाच्या सुरूवातीला उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.हजारो विद्यार्थी विद्यापीठाकडे अर्ज करणार असल्याची कल्पना विद्यापीठाला होती.त्यानुसार 15 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रासह इतरही राज्यातील उमेदवारांनी अर्ज केले आहेत. 

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, विद्यापीठाकडे आत्तापर्यंत 3 हजार 890 उमेदवारांनी नोंदणी केली आहे.त्यातील 635 उमेदवारांनी अर्ज भरून संबमीट केले असून त्यातील 457 उमेदवारांनी अर्जासह शुल्कही जमा केले आहे.तसेच येत्या 31 जानेवारीपर्यंत विद्यापीठाकडे 5 हजार अर्ज जमा होण्याची शक्यता आहे.विद्यापीठाला गुणवत्ता धारक उमेदवार मिळावेत यादृष्टीने आमचा प्रयत्न असणार आहे. 

--------------------------------