JEE Main 2025 Session 1 : परीक्षेसाठी नोंदणी सुरू, 'या' तारखांना होणार परीक्षा
पात्र विद्यार्थी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने या परीक्षेत सहभागी होण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उच्च शिक्षण विभागाने JEE Mains 2025 सत्र 1 (JEE Mains 2025 Session 1) परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू (Start the registration process) करण्यात आली आहे. अर्ज नोंदणी करण्याची अंतिम मुदत 22 नोव्हेंबर 2024 (Deadline 22 November 2024) पर्यंत देण्यात आली आहे. पात्र विद्यार्थी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने या परीक्षेत सहभागी होण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
JEE मुख्य पेपर 1 द्वारे, विद्यार्थी अंडरग्रेजुएट इंजिनिअरिंग प्रोग्राम्स (BE/B.Tech) मध्ये प्रवेश घेऊ शकतील, तर पेपर 2 द्वारे, विद्यार्थी B.Arch आणि B.प्लॅनिंग कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊ शकतील. NITs, IITs/देशातील सर्वोच्च विद्यापीठे/संस्थांमध्ये रँकच्या आधारावर प्रवेश दिला जाईल.
महत्त्वाच्या तारखा
JEE मुख्य सत्र 1 अर्ज नोंदणी आणि फी भरण्याची अंतिम तारीख 22 नोव्हेंबर नोव्हेंबर देण्यात आली आहे. परीक्षा सिटी स्लिप प्रसिद्ध करण्याची तारीख जानेवारी 2025 चा पहिला आठवडा. NTA वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख परीक्षेच्या तारखेच्या तीन दिवस आधी. परीक्षेची तारीख 22 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 असेल तर 12 फेब्रुवारी रोजी निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
अर्ज कसा करायचा
JEE Mains अर्ज भरण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा. वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, तुम्हाला ताज्या बातम्यांमध्ये JEE (मुख्य) - 2025 सत्र 1 साठी ऑनलाइन अर्जावर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला नवीन नोंदणी लिंकवर क्लिक करून प्रथम नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतर, उमेदवारांनी इतर तपशील भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. शेवटी, विहित शुल्क भरल्यानंतर, विद्यार्थ्याने पूर्णपणे सबमिट केलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्यावी.