MHT CET 2024 : PCM आणि PCB मॉक टेस्ट आणि  गट जोडता येणार 

उमेदवारांना माॅक टेस्ट देण्यासाठी अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट देवून ही टेस्ट देता येणार आहे.

MHT CET 2024 : PCM आणि PCB मॉक टेस्ट आणि  गट जोडता येणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) कक्षातर्फे,  PCM आणि PCB (PCM and PCB groups) या दोन्ही गटांसाठी MHT CET मॉक टेस्ट (MHT CET Mock Test) घेण्यात येत आहे. जे उमेदवार अद्याप  माॅक टेस्ट देण्याचे बाकी असतील ते अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org ला भेट देवून ही टेस्ट देवू शकतात. तसेच उमेदवारांना आपल्या ग्रुपमध्ये काही बदल करायचा असेल किंवा विषयांमध्ये सुधारणा करायची असेल तर करता येणार आहे. त्यासाठी काही शुल्क आकारण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी . 

MHT CET मॉक टेस्ट लिंक 2024 सोबत CET सेलने अर्जामध्ये गट जोडण्याची संधी दिली आहे. ही सुविधा आज म्हणजेच 27 एप्रिलपर्यंत उपलब्ध असेल. PCM/PCB गट  जोडण्याची सुविधा 27 एप्रिल 2024 रोजी 12:00 AM ते 23:59 PM पर्यंत खुली असेल," अशी नवीन अपडेट समोर आली आहे. 

वेळापत्रकानुसार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा जीवशास्त्र (PCM किंवा PCB) गटांसाठी MHT CET 2024 परीक्षा 2 मे पासून सुरु होणार असून 17 मे पर्यंत चालेल. MHT CET PCM आणि PCB दोन्ही ग्रुपच्या परीक्षा दोन शिफ्टमध्ये संगणक आधारित चाचणी (CBT) मोडमध्ये होतील. सकाळची शिफ्ट सकाळी 9 वाजता सुरू होईल आणि दुपारी 12 वाजता संपेल तर दुपारची शिफ्ट दुपारी 2 सुरु होईल आणि सायंकाळी 5 वाजता संपेल.