राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 166 पदांसाठी भरती सुरू
राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत विविध पदांच्या एकूण 166 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन तपशीलवार माहिती घेऊ शकतात.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती (National Health Mission, Amravati) अंतर्गत विविध पदांच्या एकूण 166 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू (Application process begins) करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन तपशीलवार माहिती घेऊ शकतात. अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायचा असून त्याची अंतिम मुदत 3 एप्रिलपर्यंत (Deadline April 3) देण्यात आली आहे.
या भरती मोहिमेअंतर्गत स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी (पुरुष), वैद्यकीय अधिकारी (महिला), लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, प्रोग्राम असिस्टंट, जिल्हा प्रोग्राम मॅनेजर, फिजिओथेरपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, काउन्सलर यांच्यासारख्या पदांच्या एकूण 166 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरती प्रक्रियेत वेगवेगळी पदे असल्यामुळे त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि परीक्षा शुल्क यांमध्ये फरक आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देवून तपशीलवर माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यु आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला, जिल्हा रुग्णालय, इर्विन चौक, अमरावती या पत्त्यावर अर्ज पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रिक्त पदांसाठी नव्याने जाहिरात देण्यात येणार नसून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी सकाळी ११ वाजता Walk in Interview द्वारे रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रथम उमेदवारांना आपला अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे सादर करावा लागणार आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांचाच मुलाखतीसाठी विचार केला जाणार आहे. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरू असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचूक नोंदवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबत "District Integrated Health & Family Welfare Society, Amravati" या नावे देय असलेला राष्ट्रीयकृत बँकेचा DD जोडावा लागणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी १५० रुपये तर राखीव प्रवर्गासाठी १०० रुपयांचा DD तसेच त्याच्या मागे स्वः हस्ताक्षरात स्वतःचे नांव व सही करावी असे सांगण्यात आले आहे.