RRB, RPF, RPSF पदांसाठी भरती परीक्षेच्या अर्जाची स्थिती प्रसिद्ध

RRB RPF 2024 मध्ये SI पदांसाठी अर्ज केलेले सर्व उमेदवार rrbapply.gov.in वर त्यांच्या अर्जाची स्थिती तपासू शकतात.

RRB, RPF, RPSF पदांसाठी भरती परीक्षेच्या अर्जाची स्थिती प्रसिद्ध
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
रेल्वे भरती बोर्डाने (Railway Recruitment Board) रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (Railway Protection Force (RPF)) आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स (Railway Protection Special Force) मध्ये कार्यकारी उपनिरीक्षक पदांसाठी भरती परीक्षेची अर्जाची स्थिती (Application status) प्रसिद्ध केली आहे. RRB RPF 2024 मध्ये एसआय (SI) पदांसाठी अर्ज केलेले सर्व उमेदवार rrbapply.gov.in वर त्यांच्या अर्जाची स्थिती तपासू शकतात. या भरती प्रक्रियेत उपनिरीक्षक पदाची 452 आणि कॉन्स्टेबलच्या 4 हजार, 208  रिक्त पदांचा समावेश आहे.
RRB ने जारी केलेल्या माहितीनुसार, संगणक आधारित परीक्षेचे (CBT) वेळापत्रक आणि प्रवेशपत्राची (Timetable And Hallticket) माहिती अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केली जाणार आहे. या संदर्भात उमेदवारांना एसएमएस आणि ई-मेलद्वारे माहिती दिली जाईल. परीक्षेच्या तारखेच्या चार दिवस आधी प्रवेशपत्र दिले जातील. परीक्षेच्या तारखेच्या दहा दिवस अगोदर परीक्षार्थींना परीक्षा शहराची माहिती दिली जाईल. 

दरम्यान, RRBs ने स्पष्ट केले आहे की, कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्जाची स्थिती अद्याप जाहीर केलेली नाही. उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ई-मेल पत्त्यावर एसएमएस आणि ईमेलद्वारे माहिती पाठवली जाईल. 
कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही मदतीची आवश्यकता असल्यास, ते 9592-001-188 आणि 0172-565-3333 किंवा rrb.help@csc.gov.in वर ईमेल करू शकतात. ही सेवा सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असेल, असे RRB कडून कळवण्यात आले आहे.