शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध; शिक्षणमंत्र्यांची ग्वाही

राज्यातीत सर्वात मोठी शिक्षण सेवक भरती मी करून दाखवती अनेक जण टीका करतात पण त्या टीकेला काहीच अर्थ नाही. शिक्षकांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते मी मान्य करतो.

शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध; शिक्षणमंत्र्यांची ग्वाही

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातीत सर्वात मोठी शिक्षण सेवक भरती (Education Servant Recruitment) मी करून दाखवती अनेक जण टीका करतात पण त्या टीकेला काहीच अर्थ नाही. शिक्षकांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते मी मान्य करतो. मात्र, आगामी काळात ते पूर्ण करण्यासाठी (Pending demands will be resolved) मी प्रयत्नशील आहे. मी लवकरच शिक्षक संघटनेची मंत्रालयात  राज्य स्तरावर बैठक घेऊन उर्वरित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Education Minister Deepak Kesarkar) यांनी दिली आहे. 

बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी मी कटिबद्ध असून शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावरून जे-जे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली. सावंतवाडी येथे शिक्षक संघटनेच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय शिक्षण परिषद व गुणवंत शिक्षक सन्मान सोहळ्यात मंत्री केसरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पदवीधर आमदार निरंजन डावखरे देखील उपस्थित होते. 

पदवीधर आमदार निरंजन डावखरे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, पदवीधरांच्या प्रश्नांसाठी शासन स्तरावर मी आग्रही आहे. मला कोकणातील पदवीधर बांधवांनी खूप प्रेम दिले त्याचा उतराई होण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे.