SPPU NEWS : विद्यापीठाकडून संशोधनासाठी दहा कोटीची तरतूद 

विद्यापीठ आवारातील प्राध्यापकांसाठी ४ कोटी तर संलग्न महाविद्यालयातील (affiliated colleges) प्राध्यापकांसाठी १० कोटी रुपये निधी विभागून देण्यात आला आहे.

SPPU NEWS : विद्यापीठाकडून संशोधनासाठी दहा कोटीची तरतूद 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) प्राध्यापकांच्या संशोधनासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे.अस्पायर योजनेसाठी (Aspire Scheme) ही तरतूद करण्यात आली असून विद्यापीठ आवारातील प्राध्यापकांसाठी ४ कोटी तर संलग्न महाविद्यालयातील (affiliated colleges) प्राध्यापकांसाठी १० कोटी रुपये निधी विभागून देण्यात आला आहे.विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

हेही वाचा : एनएसएस स्वच्छतेच्या कामा पुरते , आता हे चित्र बदलणार..

सावित्रीबाई पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांना बीसीयुडी रिसर्च पोरजेक्ट अंतर्गत संशोधन करण्यास आर्थिक सहकार्य केले जात होते. मात्र,  गेल्या काही वर्षांपासून अस्पायर सारख्या योजनांसाठी दिला जाणारा निधी थांबवण्यात आला होता.त्यामुळे एकूणच विद्यापीठ संशोधन क्षेत्रात संशोधनात मागे पडले होते.त्यातच एनआरआयएफ रॅकिंगमध्ये विद्यापीठाची सातत्याने घसरण झाली .त्यामागे अनेक कारणे आहेत.मात्र, संशोधनाकडे झालेले दूर्लक्ष हे अनेक कारणांपैकी एक कारण आहे.संशोधन वाढल्यास विद्यापीठाचे रॅकिंग वाढणार आहे. 

विद्यापीठाकडून गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत संशोधनाला चालना देण्यासाठी प्रोत्साहन दिले जात होते.मात्र, या योजनेसाठी दिल्या जाणा-या निधीत दिवसेंदिवस घट करण्यात आली.त्याचाही परिणाम विद्यापीठातील व संलग्न महाविद्यालयातील संशोधनावर झाला.विद्यापीठात व महाविद्यालयात रिसर्च कल्चर निर्माण व्हावे, या उद्देशाने गेल्या काही वर्षात आवश्यक प्रयत्न होऊ शकले नाहीत.मात्र, आता अस्पायर योजनेसाठी १० कोटीची तरतूद केल्यामुळे प्राध्यापक पुन्हा संशोधनाकडे वळतील,  अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य देविदास वायदंडे म्हणाले, अस्पायर योजनेच्या निधी बरोबरच विद्यापीठाच्या स्टॅट्यूट (परिनियम ) बाबत व्यवस्थापन परिषदेत चर्चा झाली.त्यात नवे परिनियम तयार होत  नाहीत तोपर्यंत जूने परिनियम लागू असतील,असाही निर्णय  व्यवस्थापन परिषदेत घेण्यात आला.त्यामुळे प्राध्यापकांच्या राजेचा प्रश्न मार्गी लगाणार आहे.  
--------------------------------------

" सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक नुकतीच पार पडली. त्यात अस्पायर योजनेसाठी १० कोटी रुपये निधीची तरतुद करण्याचा निर्णय घेण्यात आला.आता प्राध्यापकांना विविध रिसर्च प्रोजेक्टवर काम करता येईल. १० कोटी रुपये निधीची तरतुद झाल्याने विद्यापीठ विभागातील प्राध्यापकांना ४ कोटी व संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांना ६ कोटी निधी उपलब्ध होणार आहेत ." 

 - डॉ. देविदास वायदंडे , सदस्य, व्यवस्थापन परिषद , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ