"...अन्यथा आत्महत्या करणार"; MPSC पात्र उमेदवाराचे व्हायरल पत्र
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जानेवारी 2023 मध्ये आलेल्या गट क लिपीक टंकलेखन आणि कर सहायक पदाच्या जाहिरातीला दोन वर्षे उलटून गेली आहेत. मी तन, मन, धनाने यासाठी प्रयत्न करून पूर्व, मुख्य, कौशल्य चाचणी उत्तीर्ण झालो आहे. तरी देखील आयोगाकडून अजून GML, provisignal पण नाही.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (MPSC) उत्तीर्ण होऊन दोन वर्षे झाली. परंतु अद्याप नियुक्ती मिळाली नाही. त्यामुळे एका उमेदवाराने थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र लिहले आहे. सध्या ते सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. एमपीएससी तर्फे जानेवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या गट - क लिपीक टंकलेखन आणि कर सहायक (Group - C Clerk Typing and Tax Assistant) पदाच्या जाहिरातीला दोन वर्षे तर परीक्षेला सुमारे एक वर्षे झाले आहेत. मी तन, मन, धनाने यासाठी प्रयत्न करून पूर्व, मुख्य, कौशल्य चाचणी उत्तीर्ण झालो आहे. तरीदेखील आयोगाकडून सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती गुणवत्ता यादी अद्याप प्रसिद्ध झाली नाही. त्यामुळे येत्या २६ जानेवारीपूर्वी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध न केल्यास आत्महत्या करावी लागेल, असे संतापजनक पत्र त्याने लिहिले आहे.
प्रत्येक परीक्षेमागे प्रत्येकाचे काही नियोजन असते. परीक्षा लांबल्यामुळे काहींचे ठरलेले लग्न मोडते. नोकरी नंतरच लग्न करायचे म्हणून बहुतांश उमेदवारांचे वय ३० च्या पुढे गेले आहे. आता तर आई-वडील पण शंका घेऊ लागले की, आपला मुलगा खरच नोकरीला जाणार की नाही. आमच्या व्यथा ना शासन ऐकतंय ना प्रशासन, राजकीय लोक स्वार्थ असेल तर लक्ष घालतात अन्यथा त्यांना पण विद्यार्थी नको आहेत, अशी व्यथा या विद्यार्थ्यानी आपल्या व्हायरल केलेल्या पत्रात मांडली आहे.
_______________________________________
स्पर्धा परीक्षा देणारी मुले आता मानसिक तणावातून जात आहेत. मुलांनी स्वप्न पाहणे, आणि ती सत्यात उतरवणे चुकीचे आहे का ? अभ्यास , कष्ट करून मुले परीक्षा पास झाले आहेत. आता त्यांना नोकरी वर घेण्यासाठी विलंब का ? या मुलांना काय झाले तर आयोग व सरकार जबाबदार राहिल का? सादरचे पत्र सोशल मिडियावर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांच्या भावना मांडत आहे. या गोष्टीकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे.
रविकांत वरपे, राष्ट्रवादी नेते