NEET परीक्षेत सामान गुण असल्यास कोणाला प्राधान्य, NTA कडून टाय ब्रेकिंग नियमांमध्ये बदल

यामध्ये संगणकीय सोडतीद्वारे विषयातील संख्या किंवा टक्केवारीनुसार गुणवत्ता किंवा श्रेणी निश्चित केली जाणार.

NEET परीक्षेत सामान गुण  असल्यास कोणाला प्राधान्य,  NTA कडून टाय ब्रेकिंग नियमांमध्ये  बदल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच (NTA) द्वारे राबवली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET UG 2024) येत्या 5 मे रोजी पेपर-पेन पद्धतीने देशभरातील 554 केंद्रांवर होणार आहे. यावेळी एनटीएने टाय ब्रेकिंगच्या नव्या नियमांमध्ये बदल (Change in new rules) केला आहे. यामध्ये संगणकीय सोडतीद्वारे (Computer lottery) विषयातील संख्या किंवा टक्केवारीनुसार गुणवत्ता किंवा श्रेणी निश्चित केली जाईल. या अंतर्गत दोन किंवा अधिक उमेदवारांना समान संख्या किंवा टक्केवारी असल्यास गुणवत्तेच्या आधारावर श्रेणी (Grades on the basis of merit) दिली जाईल. 

जीवशास्त्र (वनस्पतिशास्त्र आणि प्राणीशास्त्र) मध्ये जास्त गुण किंवा टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्याला प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर रसायनशास्त्रात जास्त गुण किंवा पर्सेंटाईल असलेला विद्यार्थी आणि तिसऱ्या स्थानावर भौतिकशास्त्रात जास्त गुण किंवा पर्सेंटाईल असलेला विद्यार्थी असेल. जर या तिन्ही विषयात समान गुण असतील तर  संगणक किंवा आयटी लॉटरी प्रणालीद्वारे गुणवत्ता किंवा श्रेणी निश्चित केली जाईल. यापूर्वी गेल्या वर्षीपर्यंत  NEET UG परीक्षेतील टाय-ब्रेकिंग पॉलिसीसाठी पात्रता निकषांमध्ये विद्यार्थ्याचे वय आणि NEET UG अर्ज क्रमांक यांचा समावेश होता.

NTA ने राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा, अंडरग्रेजुएट (NEET UG 2024) साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या परीक्षेत सहभागी होण्यास इच्छुक असलेले उमेदवार neet.ntaonline.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 मार्च देण्यात आली आहे.