महाराष्ट्र एमबीए सीईटी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेला होणार परीक्षा

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र एमबीए सीईटी परीक्षा 9, 10 आणि 11 मार्चला घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र एमबीए सीईटी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेला होणार परीक्षा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र एमबीए सीईटी परीक्षेचे (Maharashtra MBA CET Exam) सुधारित वेळापत्रक जाहीर (Revised schedule announced) करण्यात आले आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) घेण्यात येणारी ही परीक्षा 9, 10 आणि 11 मार्चला (Exam on 9th, 10th and 11th March) घेण्यात येणार आहे. यापूर्वी ही परीक्षा केवळ दोन दिवस म्हणजे 9 आणि 10 मार्चला होणार होती. मात्र, आता सुधारित वेळपत्रकानुसार ती 9, 10 आणि 11 मार्च या तीन दिवसांसाठी घेतली जाणार आहे.

या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, एमबीए/एमएमएस सीईटी 2024 परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वाढती संख्या लक्षात घेता, परीक्षेचे दिवस वाढवण्यात आले आहेत. सामायिक प्रवेश परीक्षा 9, 10 आणि 11 मार्च रोजी घेतली जाईल, यासाठी उमेदवारांना आवश्यक तपशील जसे की नोंदणी क्रमांक आणि इतर तपशील प्रविष्ट करावे लागतील. 

 महाराष्ट्र MBA CET परीक्षा प्रवेशपत्र असे करा डाउनलोड 

सर्व उमेदवारांना प्रथम अधिकृत वेबसाइट cetcel.mahacet.org ला भेट द्या. तुम्हाला होम पेजवर दिसणाऱ्या MBA/MMS CET ऍडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा. त्यानंतर विचारलेला तपशील प्रविष्ट करा. ॲडमिट कार्ड तुमच्या समोर दिसेल. उमेदवारांनी त्याची प्रिंटआउट काढून घ्यावी.