डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा २६ नोव्हेंबरपासून
विधानसभा निवडणुकीमुळे विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षांचे वेळापत्रक लांबणीवर गेले. त्यानंतर आता विद्यापीठ संलग्न सर्व महाविद्यालयाच्या नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा २६ नोव्हेंबरपासून घेण्यात येणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) नियमित पदवी अभ्यासक्रमाची सत्र परीक्षा २६ नोव्हेंबरपासून (Sessional examination of degree course from 26 November) तर पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. विधानसभा निवडणुकीमुळे विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या (University Degree, Post Graduate Course) सत्र परीक्षांचे वेळापत्रक लांबणीवर गेले. त्यानंतर आता विद्यापीठ संलग्न सर्व महाविद्यालयाच्या नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा २६ नोव्हेंबरपासून घेण्यात येणार आहे.
पदवी, पदव्युत्तर परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाने अंतिम केले असून पदव्युत्तर परीक्षा डिसेंबरमध्ये सुरु होणार आहेत. परीक्षांसाठीची कार्यवाही पूर्ण करण्याची प्रक्रिया परीक्षा विभागाकडून सुरू आहे. प्रारंभी १२ नोव्हेंबरपासून या परीक्षा सुरू होणार होत्या. मात्र, अनेक शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी निवडणुकीच्या कामावर आहेत. यासह विद्यापीठाने दिवाळी सुट्ट्यांचे नियोजन होते. त्यामुळे निवडणूकीचे निकाल २३ नोव्हेंबरला हाती आल्यानंतर लगेच २६ तारखेपासून विद्यापीठाच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा - विद्यापीठात 'प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस; पदे भरणार; कुलगुरू डाॅ. फुलारी यांची माहिती
विद्यापीठाचे वार्षिक वेळापत्रक कोलमोडले
महिनाभर परीक्षा लांबल्याने निकालाची प्रक्रिया ही लांबणीवर पडणार आहे. लांबलेली प्रवेश प्रक्रिया, पदवी, पदव्युत्तर परीक्षांच्या वेळापत्रकातील बदलामुळे विद्यापीठाने निश्चित केलेले २०२४-२५ शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे. विद्यापीठ संलग्न महाविद्यालयाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षा नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहेत.
१५ डिसेंबरपासून पदव्युत्तर परीक्षा
पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा थेट डिसेंबरमध्ये सुरू होणार आहेत. पदवी, पदव्युत्तरचे वेळापत्रक ऑक्टोबर ते डिसेंबर-जानेवारी असे झाले आहे. पदवी अभ्यासक्रमानंतर १५ डिसेंबरपासून विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यानंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्रसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
eduvarta@gmail.com