SSC कनिष्ठ अभियंता भर्ती टियर 2 परीक्षेची तात्पुरती उत्तर की प्रसिद्ध
SSC ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, 'कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) परीक्षा, 2024 (पेपर-II) परीक्षेसाठी तात्पुरती उत्तर की प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच परीक्षेची उत्तरपत्रिकाही अपलोड करण्यात आली आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार ssc.gov.in या पोर्टलला भेट देऊन ते डाउनलोड करू शकतात.'
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
स्टाफ सिलेक्शन कमिशनने (Staff Selection Commission) SSC कनिष्ठ अभियंता भर्ती टियर 2 परीक्षेसाठी तात्पुरती उत्तर की https://ssc.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे (The provisional answer key for Junior Engineer Recruitment Tier 2 Examination has been released) परीक्षेला बसलेले उमेदवार (candidates) पोर्टलला भेट देऊन उत्तर कीज डाउनलोड करू शकतात.
SSC ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, 'कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) परीक्षा, 2024 (पेपर-II) परीक्षेसाठी तात्पुरती उत्तर की प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच परीक्षेची उत्तरपत्रिकाही अपलोड करण्यात आली आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार ssc.gov.in या पोर्टलला भेट देऊन ते डाउनलोड करू शकतात.'
या उत्तरपत्रिकेवर आक्षेप नोंदणीसाठी उमेदवारांना 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. उमेदवारांना विहित शुल्क भरून हरकती सादर करायच्या आहेत. शुल्क जमा केल्याशिवाय कोणतेही निवेदन स्वीकारले जाणार नाही, असेही SSC कडून सांगण्यात आले आहे.
उत्तर की वर आक्षेप नोंदवण्यासाठी सर्वप्रथम, उमेदवारांना SSC च्या https://ssc.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. मुख्यपृष्ठावरील "उत्तर की" विभागात जा आणि तात्पुरत्या SSC JE उत्तर की वर आक्षेप घेण्यासाठी लिंक निवडा. आता तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. आपल्या आक्षेपासाठी समर्थन पुरावे (supporting evidence)अपलोड करा आणि आक्षेप शुल्क भरण्यासाठी प्रश्न निवडा आणि पुनरावलोकनासाठी सबमिट करा. आता घेतलेल्या आक्षेपाची प्रिंटआउट घ्या.
eduvarta@gmail.com