महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ : पाचवी आणि आठवीसाठी अर्ज नोंदणीला सुरुवात

इच्छुक उमेदवारांना १५ जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली.

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ :  पाचवी आणि आठवीसाठी अर्ज नोंदणीला सुरुवात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाकडून (Maharashtra State Open School Board) शैक्षणिक वर्ष २०२४-२५ (Academic year 2024-25) साठी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी अर्ज नोंदणीला सुरुवात (Start of application registration) करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना १५ जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली.

राज्य मुक्त विद्यालय मंडळात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नाव नोंदणी व प्रवेश अर्ज भरण्यास आणि कागदपत्र स्विकारण्यासाठी १५ जून रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज, शुल्क, मुळ कागदपत्रे आणि यादी विभागीय मंडळात जमा करण्यासाठी केंद्र शाळांना २४ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.  

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अखत्यारित महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ कार्यरत आहे. या मंडळातर्फे पाचवी, आठवीला प्रवेश दिले जातात. शाळा संपर्क केंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापनही केले जाते. यामध्ये दरवर्षी हजारो विद्यार्धी प्रवेश घेत असतात. 

येत्या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया मंडळाने सुरू केली आहे. त्यानुसार नव्याने नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ५ ते १८ जून या कालावधीत विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, शुल्क, कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत जमा करावी लागतील. २४ जूनला संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, शुल्क, मूळ कागदपत्रे आणि यादी विभागीय मंडळात जमा करायची आहे. अधिक माहिती https://msbos.mh-ssc.ac.in/ या संकेतस्थळावर देण्यात आल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.