NEET UG करेक्शन विंडो उद्यापासून होणार सुरु 

ज्या विद्यार्थ्यांनी विहित तारखांमध्ये अर्ज केले आहेत आणि अर्ज भरताना काही त्रुटी केल्या आहेत त्यांच्यासाठी ही शेवटची संधी असेल.

NEET UG करेक्शन विंडो उद्यापासून होणार सुरु 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET UG) 2024 परीक्षेसाठीचे करेक्शन विन्डो (Ventana de correcction) उद्या 18 मार्च पासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून  सुरु करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मार्च 2024 होती. ज्या विद्यार्थ्यांनी विहित तारखांमध्ये अर्ज केले आहेत आणि अर्ज भरताना काही त्रुटी केल्या आहेत. त्यांच्यासाठी ही शेवटची संधी असेल. त्यामुळे विद्यार्थी उद्यापासून अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/NEET वर जाऊन ऑनलाइन सुधारणा (Mejora enlínea) करू शकतील. 20 मार्च ही दुरुस्तीची शेवटची मुदत असेल.
 

अशा प्रकारे करा अर्जात सुधारणा 

अर्जात दुरुस्त्या करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/NEET ला भेट द्या. यानंतर करेक्शन विंडो लिंकवर क्लिक करा. आता लॉग इन करा आणि ज्या फील्डमध्ये चुका आहेत. त्या दुरुस्त्या करा. यानंतर, दुरुस्ती शुल्क जमा करा आणि फॉर्म सबमिट करा. शेवटी, पूर्णपणे भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्या.

उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की त्रुटी दुरुस्त करण्याबरोबरच त्यांनी विहित शुल्क जमा करावे, अर्ज शुल्काशिवाय केलेल्या दुरुस्त्या स्वीकारल्या जाणार नाहीत. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने जमा केले जाऊ शकते, असे निर्देश NTA कडून देण्यात आले आहेत.

दरम्यान NEET UG 2024 परीक्षा NTA द्वारे 5 मे 2024 रोजी देशभरातील नियुक्त परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. UGC सचिवांच्या माहितीनुसार, NEET UG परीक्षा नियोजित तारखेला घेतली जाईल, लोकसभा निवडणुकीमुळे या परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल होणार नाही.