आयएएस अधिकारी राहुल सिंग  सीबीएसईचे नवीन अध्यक्ष 

हा निर्णय भारत सरकारच्या उच्चस्तरीय व्यवस्थापनाने मोठ्या प्रमाणावर केलेल्या प्रशासकीय कारवाईचा एक भाग म्हणून घेतला आहे. 

आयएएस अधिकारी राहुल सिंग  सीबीएसईचे नवीन अध्यक्ष 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इयत्ता 10 वी, 12वी च्या परीक्षा अजून सुरु असताना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ,(CBSE)   प्रमुख बदलण्यात आले आहेत. आयएएस अधिकारी राहुल सिंग (Rahul Singh) यांना सीबीएसईचे नवीन अध्यक्ष बनवण्यात आले आहे. यापूर्वी आयएएस निधी छिब्बर (Nidhi Chhabbar) या सीबीएसईच्या प्रमुख होत्या. हा निर्णय भारत सरकारच्या उच्चस्तरीय व्यवस्थापनाने मोठ्या प्रमाणावर केलेल्या प्रशासकीय कारवाईचा (Administrative action) एक भाग म्हणून घेतला आहे. 

मंत्रालय आणि विभागांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगमधील ताज्या बदलांनंतर, भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी राहुल सिंग जुन्या CBSE अध्यक्ष निधी छिब्बर यांची जागा घेतील. आता राहुल सिंग केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची संपूर्ण जबाबदारी सांभाळतील. यापूर्वी राहुल सिंग कार्मिक आणि प्रशिक्षण विभागात (DoPT) अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. ते भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) 1996 च्या बॅचचे बिहार केडरचे IAS अधिकारी आहेत.

कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) 1996 बॅचचे बिहार केडरचे IAS अधिकारी राहुल सिंग यांची CBSE चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. त्याच वेळी, निधी छिब्बर यांची NITI आयोगामध्ये सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

निधी छिब्बर यांना 24 मार्च 2024 नंतर एका वर्षासाठी अतिरिक्त सचिव पदावर आणि वेतनश्रेणीनुसार निती आयोगामध्ये सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. यासाठी त्यांचा केंद्रीय प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवण्यात येणार आहे.