राष्ट्रीय बियाणे महामंडळात नोकरीची संधी, विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती अंतर्गत उपमहाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, वरिष्ठ प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी अशी विविध पदांच्या एकूण १८८ रिक्त जागा भरण्यात येत आहेत.

राष्ट्रीय बियाणे महामंडळात नोकरीची संधी, विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राष्ट्रीय बियाणे महामंडळ (National Seed Corporation) भरती अंतर्गत उपमहाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, वरिष्ठ प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी अशी विविध पदांच्या (Recruitment process started for various posts) एकूण १८८ रिक्त जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर (Last date for submission of applications is 30 November) देण्यात आली आहे. 

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवार अधिकृत संकेतस्थळ https://www.indiaseeds.com/ वर जाऊन अर्ज करू शकतात. सदरील भरतीमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर -१ , असिस्टंट मॅनेजर -१ , ट्रेनी मॅनेजमेंट एचआर-२,  ट्रेनी मॅनेजमेंट(गुणवत्ता नियंत्रक) -२,  ट्रेनी मॅनेजमेंट इलेक्ट्रिक इंजिनियर -१ , ट्रेनी सीनियर दक्षता विभाग - २, ट्रेनी (अॅग्रिकल्चर) - ४९, ट्रेनी (गुणवत्ता नियंत्रक) -११, ट्रेनी मार्केटिंग -३३, ट्रेनी (एचआर) -१६, ट्रेनी स्टेनोग्राफर -१५, ट्रेनी (अकाऊंटंट) -८, ट्रेनी (अग्रिकल्चर स्टोर) -१९, ट्रेनी इंजिनिअरींग स्टोर -७, ट्रेनी टेक्निकल -२१ अशा एकूण विविध १८८ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून डिप्लोमा उत्तीर्ण झालेला असावा, अभियंता पदवीधर तसेच विविध क्षेत्रातून पदवीचे शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. यासाठी २७ ते ५० वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. तर ओबीसी -५ तर एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षाची सुट देण्यात येणार आहे. खुल्या व ओबीसी प्रवर्गासाठी ५०० रूपये परीक्षा शुल्क आकारण्यात आला आहे तर इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्कामध्ये सुट देण्यात आली आहे. 

विविध पदासाठी विविध पात्रता निकष देण्यात आले आहेत. आपल्याला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, पदांची नावे, पद संख्या, वयोमर्दा, अंतिम तारीख, अर्ज कसा करावा, यासह इतर सर्व माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.