JEE मेन पेपर 2 चा निकाल जाहीर 

NTA ने 24 जानेवारी रोजी पहिल्या सत्रासाठी JEE मुख्य पेपर 2 परीक्षा 2024 आयोजित केली होती.

JEE मेन पेपर 2 चा निकाल जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर JEE मेन पेपर 2 चा निकाल जाहीर झाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने पहिल्या सत्रासाठी घेतलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षेच्या मुख्य पेपर 2 चा निकाल जाहीर केला आहे. निकालाची लिंक अधिकृत jeemain.nta.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

उमेदवारांना त्यांचा निकाल  तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी त्यांचा JEE अर्ज क्रमांक आणि पासवर्डची आवश्यक आहे. हे तपशील प्रविष्ट केल्यानंतरच उमेदवार निकाल तपासू शकतात.  NTA ने 24 जानेवारी रोजी पहिल्या सत्रासाठी JEE मुख्य पेपर 2 परीक्षा 2024 आयोजित केली होती. यानंतर नुकतीच अंतिम उत्तर की जाहीर केली होती. 

उमेदवाराचे तपशील, JEE अर्ज क्रमांक आणि रोल नंबर, विषयनिहाय गुण आणि इतर तपशील पेपर 2 च्या निकालात उपलब्ध असतील.

 असा पहा निकाल 

* सर्व प्रथम उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल – jeemain.nta.ac.in. 
* आता JEE मुख्य 2024 सत्र 1 पेपर 2 (B.Arch/B.Planning) निकालाची लिंक तपासण्यासाठी लिंक उघडा. 
* लॉग इन करण्यासाठी तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
 * तुमचा निकाल तपासा आणि डाउनलोड करा.

  दरम्यान नुकतीच JEE मुख्य सत्र २ साठी नोंदणी प्रक्रिया संपली आहे. आज 07 मार्च 2024 पर्यंत, उमेदवारांना परीक्षा फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आली आहे.