टीईटी परीक्षा सुरळीत; AI तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच वापर

नियंत्रण जिल्हा कक्ष व राज्य नियंत्रण अतिशय चोख असल्याने केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार निदर्शनास आला नाही.

टीईटी परीक्षा सुरळीत; AI तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच वापर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (Maharashtra State Examination Council) माध्यमातून घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेला (TET Exam) चांगला प्रतिसाद मिळाला. परीक्षेसाठी नोंदणी (exam registration) केलेल्या 3 लाख 53 हजार 952 विद्यार्थ्यांपैकी (students) 3 लाख 29 हजार 346 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. यंदा प्रथमच परीक्षेसाठी AI तंत्रज्ञानाचा वापर (Use of AI technology for examination) करण्यात आला. यापूर्वी घडलेल्या पेपर फुटीच्या घटना आणि गैरप्रकार या पार्श्वभूमीवर 10 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेली टीईटी परीक्षा अत्यंत निकोप वातावरणात पार (Pass the TET exam in a very clean environment) पडली.

परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी राज्यातील 37 जिल्ह्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी एकूण 1 हजार 23 केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींच्या तपासणीसाठी आवश्यक यंत्राला बसवण्यात आली होती. नियंत्रणाचे नियंत्रण जिल्हा कक्ष व राज्य नियंत्रण अतिशय चोख असल्याने केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार निदर्शनास आला नाही. 

पेपर 1 साठी 1 लाख 52 हजार 605 परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 1 लाख 42 हजार 279 उमेदवार परीक्षेसाठी उपस्थित होते. पेपर 2 साठी 2 लाख 1 हजार 347 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 1 लाख 87 हजार 87 विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. प्रत्येक वर्ग खोलीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. त्याचप्रमाणे परीक्षार्थींचे बायोमेट्रिक व फेस रेकग्नेशन घेण्यात आले. लाईव्ह कॅमेरा एक्सेस असल्यामुळे प्रत्येक परीक्षा केंद्रावर नियंत्रण ठेवण्यात आले. कोणत्या वर्ग खोलीमध्ये अनुचित प्रकार घडला नसल्याचे आढळून आले आहे.

परीक्षा पार पडल्यानंतर जिल्हा केंद्रावर सर्व ओएमआर शीट (OMR Sheet) जमा करण्यात आल्या. जिल्हा केंद्रावरील जमा केलेल्या ओएमआर शीट राज्य परीक्षा परिषदेच्या मुख्य कार्यालयाकडे पाठविल्या जात आहेत. काही केंद्रांच्या ओएमआर शीट अर्थात उत्तरपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. तर काही केंद्रांच्या आज पोहोचणार आहेत.