जेईई मुख्य सत्र 2 चा निकालचा निकाल कधी..

JEE मुख्य निकाल जाहीर करण्यापूर्वी, NTA अधिकृत वेबसाइट jeemain.nta.ac.in वर अंतिम उत्तर की अपलोड करेल.

जेईई मुख्य सत्र 2 चा निकालचा निकाल कधी..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) 20 एप्रिलच्या आसपास संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मुख्य सत्र 2 (JEE Main Session 2) चा निकाल जाहीर (Results announced) करेल, अशी माहिती NTA च्या अधिकाऱ्याने एका नामांकित वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. JEE मुख्य निकाल जाहीर करण्यापूर्वी, NTA अधिकृत वेबसाइट jeemain.nta.ac.in वर अंतिम उत्तर की अपलोड करेल.

जेईई मेन 2024 चा निकाल प्रसिद्ध केलेल्या अंतिम उत्तर कीच्या आधारे संकलित केला जाईल. NTA ने आधीच जेईई मेन तात्पुरती उत्तर की प्रसिद्ध केली आहे. उमेदवारांना त्यामध्ये काही आक्षेप असतील तर नोंदवण्यास सांगितले होते.  त्यानंतर तज्ञांच्या टीमने सर्व उपस्थित आक्षेप तपासले आणि त्यावर आधारित उत्तर की अंतिम केली.

यावेळी एनटीएने जानेवारी आणि एप्रिल या दोन सत्रांमध्ये परीक्षा घेतली. एप्रिल सत्राचा निकाल JEE Advanced 2024 परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी आवश्यक कट ऑफसह घोषित केला जाईल. दोन्ही सत्रांमध्ये एकूण JEE मेन नोंदणींची संख्या 24 लाखांहून अधिक आहे.  सत्र 1 मध्ये 12 लाख 21 हजार 624 आणि सत्र 2 मध्ये 12 लाख 57 हजार एवढी आहे. अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना JEE मेनमधील उमेदवारांच्या सर्वोत्तम गुणांचा विचार केला जाईल.

NTA डेटानुसार, सत्र 1 मध्ये 23 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले.  100 टक्के गुण घेणारे तेलंगणामध्ये सर्वाधिक सात उमेदवार आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील प्रत्येकी तीन उमेदवार आहेत. दिल्ली आणि हरियाणात प्रत्येकी दोन उमेदवरांनी 100 टक्के घेतले आहेत. तसेच, तमिळनाडू, गुजरात आणि कर्नाटकातील प्रत्येकी एकाने सत्र 1 च्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवले आहेत.