दहावी - बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी ; विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत

बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागेल आणि दहावीचा निकाल जुनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

दहावी - बारावीच्या परीक्षेचा  निकाल कधी ; विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board) घेण्यात आलेल्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) च्या परीक्षा संपून सुमारे महिन्याभरायचा कालावधी संपला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. बोर्ड परिक्षांच्या निकालावर (10th 12th Board Exam Results) अनेकांचे भविष्य अवलंबून असते. पुढे काय करायचे, कोणत्या काॅलेजला प्रवेश घ्यायचा यासारखे प्रश्न मनात रेंगाळत असतात. त्यातच बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल जुनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

दहावी, बारावीच्या निकालाबाबत अनेकदा खोट्या बातम्या अफवा सोशल मीडीयात झपाट्याने वायरल होतात. त्यामुळे अधिकृत सूत्रांकडून माहिती मिळाल्याशिवाय निकालाच्या तारखांवर विश्वास ठेवू नये. निकालाची तारीख आता पर्यंत प्रत्यक्ष निकालाच्या केवळ एक दिवस आधीच जाहीर केली जाते. त्यामुळे याबाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी जागृत राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना निकाल पाहताना तुमचा रोल नंबर आणि आईचं नाव ही माहिती असणे आवश्यक आहे. निकाल ऑनलाईन पाहताना विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येणार आहेत.

राज्य मंडळाने किंवा शिक्षण विभागातील कोणत्याही अधिकाऱ्याने निकालाबाबत भाकीत केले नाही.तसेच अजूनही बहुतांश सर्व विभागीय मंडळाकडून निकाळाचे काम अंतिम झालेले नाही.त्यामुळे निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना विद्यार्थ्यांना आणखी एक महिना निकालाची वाट पाहावी लागणार आहे.