CISCE ने बारावी रसायनशास्त्र परीक्षेची तारीख बदलली, आता ‘या’ दिवशी होणार परीक्षा

आता ही परीक्षा २१ मार्चला दुपारच्या सत्रात २ वाजवा होणार आहे. बोर्डाच्या वतीने या संदर्भात नोटीस जाहीर करण्यात आली आहे.

CISCE ने बारावी रसायनशास्त्र परीक्षेची तारीख बदलली, आता ‘या’ दिवशी होणार परीक्षा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने  (CISCE)  यंदाच्या बारावी ISE बोर्डाच्या रसायनशास्त्र पेपर 1 विषयांची (Chemistry subject) परीक्षा काही अनपेक्षेत परिस्थितीमुळे पुढे ढकलली आहे. दरम्यान,  आता ही परीक्षा २१ मार्चला (Exam 21 March) दुपारच्या सत्रात २ वाजवा होणार आहे. बोर्डातर्फे या संदर्भात नोटीस जाहीर (Notice published) करण्यात आली आहे. मात्र, यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

बोर्डाने नोटीस जारी करून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तारखेत बदल झाल्याची माहिती दिली आहे. २०२४ वर्षाची आयएससी रसायनशास्त्र पेपर १ (लेखी) परीक्षा अनपेक्षित कारणामुळे पुढे ढकलण्यात आली असून आता ही परीक्षा २१ मार्च रोजी होणार असल्याचे बोर्डाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

 ISE बोर्ड परीक्षा २०२४ साठी बसले विद्यार्थी CISCE च्या अधिकृत वेबसाइट cisce.org वर सूचना पाहू शकतात. बारावी बोर्डाच्या परीक्षा १२ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू झाल्या आणि ३ एप्रिल २०२४ पर्यंत चालणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी वेळोवेळी बोर्डाच्या वेटसाइटवर पाहाणे आवश्यक आहे.