फ्रान्समध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना फ्रेंच शिकवी लागेल 

सप्टेंबरपासून 'क्लासेस इंटरनॅशनल' हा विशेष कार्यक्रम होणार सुरू 

फ्रान्समध्ये शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना फ्रेंच शिकवी लागेल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फ्रान्स हे सध्या डेस्टिनेशन ठरत आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना फ्रान्स मध्ये उच्च शिक्षण घ्यायची इच्छा आहे, त्या विद्यार्थ्यांना पदवी घेण्यापूर्वी फ्रेंच शिकण्यासाठी एक वर्षाचा क्लासेस इंटरनॅशनल' हा कोर्स पूर्ण करावा लागेल. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सप्टेंबरपासून 'क्लासेस इंटरनॅशनल' हा विशेष कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना फ्रेंच दूतावासाने म्हटले की ,  विद्यार्थी फ्रेंच भाषा आधीच शिकलेले असले किंवा नसले तरीही, त्या विद्यार्थ्यांना आता त्या संस्थेत इमर्सिव्ह भाषा प्रशिक्षणाचा १ वर्षाचा कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतरच सदर विद्यार्थी फ्रान्समधील उच्च शिक्षण संस्थमधून पदवीधर होऊ शकतो.

दरम्यान फ्रान्स आणि भारत या दोन्ही नेत्यांनी आंतरराष्ट्रीय वर्गखोल्या उभारण्याच्या उपक्रमाला पाठिंबा देण्याचे मान्य केले आहे. दोन्ही देशांकडून जाहीर करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, "फ्रान्समधील अत्यंत प्रतिष्ठित फ्रेंच विद्यापीठांमध्ये निवडलेल्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी भारतीय विद्यार्थ्यांना सप्टेंबर 2024 पासून परदेशी भाषा म्हणून फ्रेंच शिकायला मिळेल."