नीट परीक्षेला २५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी; सर्व विक्रम मोडीत निघाले

नीट परीक्षेला झालेली नोंदणी ही आजवरची सर्वाधिक नोंदणी आहे. यामध्ये १३ लाखांहून अधिक मुलींनी नोंदणी केली आहे. हे प्रमाण ५५ टक्क्यांहून अधिक आहे.

नीट परीक्षेला २५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी; सर्व विक्रम मोडीत निघाले

एज्युवार्ता न्यूज  नेटवर्क

नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (NTA) घेतल्या जाणाऱ्या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या (Medical Degree Course) प्रवेशाकरिता देशपातळीवर होणाऱ्या नीट-यूजी या परीक्षेकरिता यंदा २५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी (More than 25 lakh students enrolled) केली आहे. दरम्यान ही आजवरची सर्वाधिक नोंदणी आहे.  देशपातळीवरील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट (NEET entrance exam) ही एकमेव परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला सर्वाधिक विद्यार्थी बसतात. यंदा तर विद्यार्थी नोंदणीने आजवरचे सर्व विक्रम मोडले आहेत.

नीट-यूजीच्या नोंदणी अर्जा शेवटचा दिवस होता. 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'द्वारे ५ मे रोजी ही परीक्षा होणार आहे. आजपर्यंत देशभरातून २५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. २०२२ ला १८.७२ लाख, २०२३ ला २०.८७ लाख तर यंदा २५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा आकडा चार लाख २० हजारांनी वाढला आहे. यामध्ये १३ लाखांहून अधिक मुलींनी नोंदणी केली आहे. हे प्रमाण ५५ टक्क्यांहून अधिक आहे.तांत्रिक कारणांमुळे अनेकांचे अर्ज प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे नोंदणीला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी  विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे. त्यामुळे येत्या काळात NTA काय निर्णय घेते हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

युनानी, होमिओपॅथी, पशुवैद्यकीय, आयुर्वेद आणि नर्सिंगच्या जागांसह एक लाख नऊ हजार एमबीबीएसच्या आणि सुमारे २६ हजार डेंटलच्या अशा जवळपास दोन लाख जागांकरिता ही प्रवेश परीक्षा होते आहे. अनेक उमेदवारांना मुलांना आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक लिंक करता आला नसल्याने अर्ज करण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. काही विद्यार्थ्यांना मोबाइल नंबर बदलल्याने ओटीपी मिळत नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेल्या मुदतवाढीच्या मागणीला यश मिळणार का? आणि मुदतवाढ दिली जाणार का हे पाहावे लागणार आहे.