एमएचटी-सीईटी २०२४ साठी विलंब शुल्कासह अर्जासाठी मुदतवाढ

यापुढे विद्यार्थ्यांना ५०० रुपये विलंब शुल्क भरुन अर्ज करता येणार आहे. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मार्च देण्यात आली आहे.

एमएचटी-सीईटी २०२४ साठी विलंब शुल्कासह अर्जासाठी मुदतवाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) शैक्षणिक वर्षे २०२४-२५ करीता (Academic Year 2024-25) पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी (Graduate Post Graduate Course) राज्य सामाईक प्रवेश परीक्षा महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत संपली आहे. मात्र, यापुढे विद्यार्थ्यांना ५०० रुपये विलंब शुल्क भरुन अर्ज करता येणार आहे. विलंब शुल्कासह (Late fee) अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मार्च देण्यात आली आहे. याबाबतची सविस्तर माहिती (Detail information) परीक्षा कक्षेचे अधिकृत संकेतस्थळ (Official website) https://www.mahacet,org वर  उपलब्ध आहे. 

सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी अनेकवेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र, उमेदवारंच्या नोंदणी डाटाची तपासणी केली असता अनेक उमेदवरांचे अर्ज अपूर्ण असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करुन ऑनलाइन CET परीक्षेकरीता नोंदणीस विलंब शुल्कासह मुदतवाढ करण्यात आली आहे. विलंब शुल्क भरुन ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करण्यासाठी १५ मार्च ही तारीख देण्यात आली. सर्व प्रवर्गासाठी विलंब शुल्क सारखा ठेवण्यात आला आहे. एमएचटी सीईटी द्वारे घेणार येणारी परीक्षा १६ ते ३० एप्रिल दरम्यान पार पडणार आहेत. 

यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे परीक्षा कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सदरील परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज कसा भरायचा, नोंदणी वेळापत्रक माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळवर https://www.mahacet.org उपलब्ध करुन देण्यात आली आहे.