Google मध्ये इंटर्नशिपची संधी ; या तारखेपर्यंत करा अर्ज
मीडिया रीपोर्टनुसार ही एक सशुल्क इंटर्नशिप आहे, याचा कालावधी 12 ते 14 आठवड्यांचा असेल. या सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग इंटर्नशिप दरम्यान, उमेदवार आव्हानात्मक तांत्रिक प्रकल्पांवर काम करू शकतील.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
Google मधून इंटर्नशिप करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी माहिती समोर आली आहे. गुगल (Google) ने पीएचडी करणार्या विद्यार्थ्यांना हिवाळी इंटर्नशिप करण्याची संधी दिली आहे (PhD students have been given the opportunity to do winter internships.) इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट google.com/about/careers वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे.
मीडिया रीपोर्टनुसार ही एक सशुल्क इंटर्नशिप आहे, याचा कालावधी 12 ते 14 आठवड्यांचा असेल. या सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग इंटर्नशिप दरम्यान, उमेदवार आव्हानात्मक तांत्रिक प्रकल्पांवर काम करू शकतील.
या इंटर्नशीपसाठी उमेदवाराकडे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा संबंधित तांत्रिक क्षेत्रात पीएचडी पदवी असावी, उमेदवाराला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा अनुभव असावा. याव्यतिरिक्त, C/C++, Java किंवा Python मध्ये कोडिंग केलेली असणे आवश्यक आहे. अर्ज करणारे उमेदवार पात्रता आणि कामाशी संबंधित तपशीलांसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.