‘या’ शाळांनाही पॅट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका द्या; मुख्याध्यापक संघाची मागणी

शंभर टक्के खाजगी अनुदानित शाळांचे विद्यार्थी ज्याप्रमाणे शिक्षण घेतात त्याप्रमाणे टप्पा अनुदानावर असणाऱ्या शाळांतील विद्यार्थीही शिक्षण घेत आहेत. त्यामुळेच ज्याप्रमाणे शंभर टक्के खाजगी अनुदानित शाळांना या प्रश्नपत्रिका दिल्या जातात तशाच पद्धतीने टप्पा अनुदानावर असणाऱ्या शाळांना देखील उपलब्ध व्हाव्या अशी मागणी करण्यात आली आहे.

‘या’ शाळांनाही पॅट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका द्या; मुख्याध्यापक संघाची मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील टप्पा अनुदानावर असणाऱ्या शाळांनाही (Partially aided, unaided, 40/60/80 percent aided schools in the state) स्टार्स (STARS Project) प्रकल्पांतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (Question paper) देण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने केली आहे.  (Maharashtra State Secondary and Higher Secondary School Principals' Association Corporation) महामंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) (State Council of Educational Research and Training) यांच्याकडे दिले  आहे.

शंभर टक्के खाजगी अनुदानित शाळांचे विद्यार्थी ज्याप्रमाणे शिक्षण घेतात  त्याप्रमाणे अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, 40/60/80 टक्के अनुदान असणाऱ्या शाळांतील विद्यार्थीही शिक्षण घेत आहेत. त्यामुळेच ज्याप्रमाणे शंभर टक्के खाजगी अनुदानित शाळांना या प्रश्नपत्रिका दिल्या जातात तशाच पद्धतीने या टप्पा अनुदानावर असणाऱ्या शाळांना देखील उपलब्ध व्हाव्या अशी मागणी करण्यात आली आहे.   

दरम्यान, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (विद्यानिकेतन/सराव पाठशाळा, समाजकल्याण विभाग (शासकीय), जिल्हा परिषद, मनपा, नगर पालिका- नगर परिषद, शासकीय सैनिकी शाळा, कटक मंडळ, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल) या शाळांतील विद्यार्थ्यांना स्टार्स (STARS Project) प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका राज्यस्तरावरून देण्यात येतात.