ICAI CA परीक्षांच्या तारखांमध्ये बदल

गट I ची परीक्षा 1, 3 आणि 5 नोव्हेंबर रोजी होणार होती आणि गट II ची परीक्षा 7, 9 आणि 11 नोव्हेंबर रोजी होणार होती. मात्र, आता जारी करण्यात आलेल्या नव्या अधिसूचनेनुसार दिवाळी या सणामुळे त्यात बदल करण्यात आला आहे.

ICAI  CA परीक्षांच्या तारखांमध्ये बदल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

चार्टर्ड अकाउंटंट (CA) अंतिम अभ्यासक्रमाच्या गट 1 आणि गट 2 च्या परीक्षेची (Exams) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने (ICAI) नोव्हेंबर 2024 च्या सीए अंतिम परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत. ICAI ने अधिसूचनेत ही माहिती दिली आहे.

यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार (Timetable), गट I ची परीक्षा 1, 3 आणि 5 नोव्हेंबर रोजी होणार होती आणि गट II ची परीक्षा 7, 9 आणि 11 नोव्हेंबर रोजी होणार होती. मात्र, आता प्रसिध्द करण्यात आलेल्या नव्या अधिसूचनेनुसार दिवाळी या सणामुळे त्यात बदल करण्यात आला आहे. नवीन बदलानुसार आता गट 1 ची परीक्षा 3, 5, 7 नोव्हेंबर 2024 रोजी आणि गट 2 ची परीक्षा 9, 11 आणि 13 नोव्हेंबर 2024 रोजी घेतली जाईल. या परीक्षेसाठी प्रवेशपत्रे परीक्षेच्या काही दिवस आधी डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली जातील. 

नोव्हेंबर 2024 मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कर-मूल्यांकन परीक्षा (INTT-AT) आणि विमा आणि जोखीम व्यवस्थापन (IRM) तांत्रिक परीक्षेतील चार्टर्ड अकाउंटंट पोस्ट पात्रता अभ्यासक्रम परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.