दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची पायाभूत मूल्यमापण चाचणी बुधवारपासून सुरू

यंदा प्रथमच नववीच्या वर्गाचा समावेश करण्यात आला. मराठी व गणित विषयासाठी सर्व माध्यमांचा समावेश असून, इंग्रजी विषयासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा वगळण्यात आल्या आहेत. अध्ययन निष्पत्ती निश्चित करण्यासाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्या हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची पायाभूत मूल्यमापण चाचणी बुधवारपासून सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील (Local government school) विद्यार्थ्यांसह खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची संकलित मूल्यमापन चाचणीचे वेळापत्रक (Schedule for the Comprehensive Assessment Test) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार (Rahul Rekhawar) यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार बुधवार ६ ऑगस्टपासून शुक्रवार ८ ऑगस्टपर्यंत दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची पायाभूत मूल्यमापन चाचणी घेण्यात येणार आहे.

एसएससी परीक्षा रद्द : देशभरातील विद्यार्थी आक्रमक, रस्त्यावर उतरून निषेध

यंदा प्रथमच नववीच्या वर्गाचा समावेश करण्यात आला. मराठी व गणित विषयासाठी सर्व माध्यमांचा समावेश असून, इंग्रजी विषयासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा वगळण्यात आल्या आहेत. अध्ययन निष्पत्ती निश्चित करण्यासाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्या हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. राज्यातील उच्च प्राथमिक शाळांमधील जवळपास निम्मे विद्यार्थी या उपक्रमापासून वंचित राहिल्यास संपादन पातळीत वाढ करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसेल, ही वस्तुस्थिती विचारात घेऊन खासगी अनुदानित शाळांमधील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी एक आणि दोन या चाचण्या दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्याची राज्य पुरस्कृत योजना २०११ पासून सुरू आहे. त्यामुळे 'एससीईआरटी'च्या संचालकांच्या प्रस्तावानुसार राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील दुसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना संकलित मूल्यमापन चाचणीच्या प्रश्नपत्रिकांचा राज्यस्तरावरून आला आहे. पुरवठा राज्यस्तरावरून करण्यात आला आहे.