बारावी परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ, १० नोव्हेंबरपर्यंत संधी.. 

नवीन मुदतीनुसार आता ३१ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर १५ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

बारावी परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ, १० नोव्हेंबरपर्यंत संधी.. 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावी बोर्डाच्या परीक्षेचे (12th Board Exams) अर्ज भरण्यास मुदतवाढ (Extension of time for submission of application) देण्यात आली आहे. नवीन मुदतीनुसार आता ३१ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर १५ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल प्रणालीद्वारे ऑनलाइन अतिविलंब शुल्क भरावे लागणार भरायचे आहेत. तर व्यवसायिक अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत आणि काही विषय घेऊन परीक्षा देणारे विद्यार्थी, आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज कनिष्ठ महाविद्यालयातर्फे अर्ज भरायचे आहेत. त्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंतची मुदत होती. मात्र, आता अर्ज भरण्यास मदतवाढ दिली आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत खासगी विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्काद्वारे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. खासगी विद्यार्थ्यांना २० रुपये प्रतिदिन या दराने अतिविलंब शुल्क भरावे लागणार आहेत. ३१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. शिक्षणाच्या बाहेर राहिलेल्या, पण किमान पाचवी उत्तीर्ण असलेल्या मुला-मुलींना खासगीरीत्या दहावी-बारावीची परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.