CBSE Result : दहावी,बारावीच्या निकालापूर्वीच गुण पडताळणीच्या तारखा जाहीर 

निकाल जाहीर झाल्यानंतर चौथ्या दिवसांपासून आठव्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे

CBSE Result :  दहावी,बारावीच्या निकालापूर्वीच गुण पडताळणीच्या तारखा जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) चा इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल (10th and 12th result)येत्या 20 मे नंतर जाहीर केला जाईल, असे सीबीएसई बोर्डाने जाहीर केले आहे. त्यानंतर आता  CBSE बोर्डाकडून आणखीन एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे.त्यानुसार निकाल जाहीर झाल्यानंतर (After the declaration of result) चौथ्या दिवसांपासून आठव्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करता येणार (Application for Mark Verification)आहे.विद्यार्थ्यांना एकूण पाच दिवस गुणपडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर जे विद्यार्थी आपल्या निकाला विषयी असमाधानी असतील आणि ज्यांना गुणपडताळणी करायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने गुण पडताळणीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसईच्या अधिसूचनेनुसार ग्रेडची पडताळणी करण्यासाठी अर्ज करण्याची संधी पाच दिवसांसाठी उपलब्ध असेल. श्रेणीबद्ध उत्तरपत्रिकेची स्कॅन केलेली छायाप्रत निकाल जाहीर झाल्यानंतर 19 व्या दिवसापासून 20 व्या दिवसापर्यंत उपलब्ध असेल. निकाल जाहीर झाल्याच्या तारखेनंतर 24 ते 25 व्या दिवसाच्या दरम्यान उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी उपलब्ध असतील.," असे बोर्डाने म्हटले आहे. 

"बोर्ड परीक्षा २०२४ मध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांना गुणांची पडताळणी, मूल्यमापन केलेल्या उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती प्राप्त करणे आणि उत्तरांचे पुनर्मूल्यांकन करण्याची विनंती करण्याची विशिष्ट प्रक्रिया कळवली जाईल," अशी सूचना बोर्डाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे.

बोर्डाचे परिपत्रक खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 

https://acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:7ee024a0-1ca5-4aeb-9c8b-875b4c846357