आदिवासी विभाग भरती परीक्षेच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागामार्फत विविध पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या भरती परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. वेळापत्रकानुसार ९ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहेत.

आदिवासी विभाग भरती परीक्षेच्या तारखा जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागामार्फत (Maharashtra State Tribal Development Department) विविध पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या भरती परीक्षेच्या तारखा जाहीर (Recruitment exam dates announced) करण्यात आल्या आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांना आपली परीक्षा कोणत्या दिवशी घेतली जाणार आहे त्याची माहिती तपासावी. वेळापत्रकानुसार ९ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान (The exam will be held between April 9 and April 25) वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहेत. त्यासाठी भरती मोहिमेत सहभागी झालेल्या उमेदवारांनी विभागाचे अधिकृत संकेतस्थळ tribal.maharashtra.gov.in ला वेळोवेळी भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

या भरती मोहिमेअंतर्गत विभाग वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, आदिवासी विकास निरीक्षक, मुख्य लिपिक, संशोधक सहाय्यक, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, वरिष्ठ लिपिक व वार्डन आणि सुपरिंटेंडंट  इत्यादी पदांसाठीच्या ६११ रिक्त जागांसाठी ही परीक्षा घेणार आहे. या परीक्षा एप्रिल महिन्यात घेतल्या जाणार असून, ज्याची सुरुवात ९ एप्रिल रोजी वॉर्डन आणि अधीक्षक पदाच्या  परीक्षेपासून होईल. तर कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पदाच्या २५ एप्रिल रोजीच्या परीक्षेने आदिवासी विकास विभागातील परीक्षा संपन्न होतील. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग परीक्षेद्वारे, उमेदवारांना लेखी परीक्षेला बसावे लागते आणि त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करावी लागते. सर्व पदांसाठी महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग परीक्षेच्या तारीखा खाली देण्यात आल्या आहेत. आपण खाली तपासू शकता किंवा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले सविस्तर वेळापत्रक देखील तपासू शकतात. उमेदवारांना परीक्षेच्या एक आठवडा आधी प्रवेशपत्र , परीक्षेचे ठिकाण आणि इतर सूचना अधिकृत वेबसाइट www.tribal.maharashtra.gov.in वर प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.