IBPS कडून ZP भरतीच्या परीक्षेत घोळ; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप 

उमेदवाराने सातारा ZP ची परीक्षा दिलेली असताना त्याला रत्नागिरी ZP चा उल्लेख असलेली Response Sheet देणे हे संशयास्पदआहे. त्यामुळे आयबीबीएसने जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ घातल्याचा आरोप, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे.

IBPS कडून ZP भरतीच्या परीक्षेत घोळ; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

एका उमेदवाराने सातारा जिल्हा परिषदेत ग्रामसेवक पदाची परीक्षा (Satara Zilla Parishad Gramsevak Exam) दिली. गुण अत्यंत कमी असल्याने त्याने RTI द्वारे IBPS कडे Response Sheet ची मागणी केली. यावेळी उमेदवाराने सातारा ZP ची परीक्षा दिलेली असताना त्याला रत्नागिरी ZP चा उल्लेख असलेली Response Sheet देणे हे संशयास्पद (Response Sheet Suspicious) आहे. त्यामुळे आयबीबीएस ने जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ (Zilla Parishad recruitment scam) घातल्याचा आरोप, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने (Competitive Examination Coordination Committee) केला आहे. समितीने आपल्या 'एक्स' या सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत हा आरोप केला आहे. 

संबंधित उमेदवाराला संपूर्ण Response Sheet उपलब्ध करून न देता फक्त प्रश्न क्रमांक आणि सोडविलेले पर्याय याची माहिती दिली गेली. उमेदवाराला ११० गुण असून, प्रत्यक्षात मला १७०+ गुण मिळायला पाहिजे होते, असा दावा उमेदवाराने केला आहे. IBPS ने दिलेल्या रिप्लाय मध्ये "रत्नागिरी ZP" असा उल्लेख आहे. उमेदवाराने सातारा ZP ची परीक्षा दिली असताना रत्नागिरी ZP चा उल्लेख असणे संशयास्पद असल्याचे मत व्यक्त केले आहे. 

त्यामुळे परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सातारा ZP आणि IBPS ने यावर स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. तसेच IBPS ने आपल्या नियमात बदल करून यापुढे रिस्पॉन्स शीट उपलब्ध करून द्याव्यात, यामुळे उमेदवारांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ लागला आहे, असे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने म्हटले आहे.