MPSC : विद्यार्थी प्रचंड तणावात, SEBC प्रवर्ग निवडलेले अर्ज दिसतायंत EWS प्रवर्गात 

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा 2024 या परीक्षेसाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी SEBC प्रवर्गातून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून देखील या उमेदवारांचे अर्ज EWS प्रवर्गातून दिसत आहेत. त्यामुळे एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मराठा समाजातील हजारे विद्यार्थी सध्या प्रचंड तणावात आहेत. 

MPSC : विद्यार्थी प्रचंड तणावात, SEBC प्रवर्ग निवडलेले अर्ज दिसतायंत EWS प्रवर्गात 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा 2024 (Civil Services Exam 2024) या परीक्षेसाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी SEBC प्रवर्गातून (SEBC Category) अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून देखील या उमेदवारांचे अर्ज EWS प्रवर्गातून (EWS Category) दिसत आहेत. त्यामुळे एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मराठा समाजातील हजारे विद्यार्थी सध्या प्रचंड तणावात (MPSC students in tension) आहेत. 

राज्य सरकारने मराठा समाजाला (SEBC) आरक्षण लागू करण्यापूर्वी या उमेदवारांनी EWS प्रवर्गातून अर्ज केले. मात्र, मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर उमेदवारांना  SEBC प्रवर्ग निवडण्याची मुभा देण्यात आली. विद्यार्थ्यांनी SEBC प्रवर्ग निवडण्याची प्रक्रिया पूर्ण करूनही उमेदवारांचे अर्ज  EWS प्रवर्गातच दिसून येत असल्याने राज्यभरातील हजारो विद्यार्थी सध्या टेन्शनमध्ये आले आहेत. 

_______________________________

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना येत असलेल्या तांत्रिक अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी संपर्क साधत विद्यार्थ्यांना येत असलेली अडचण दूर करणेबाबत विनंती केली आहे. "एप्रिल महिन्यात मुख्य परीक्षा व त्यानंतर मुलाखती होणार असून मुलाखतीपर्यंत नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांना SEBC आरक्षणाचा लाभ देण्यात येईल व कुठल्याही उमेदवाराला अडचण येणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल" अशी ग्वाही लोकसेवा आयोगाने मुख्यमंत्री महोदयांना दिली आहे.

- अभिमन्यू पवार, आमदार औसा विधानसभा